पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ लेखांक ५५ ] ८४ श्री. श्रीमंत परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- - , अपत्यें चिमणाजी बल्लाळ कृतानेक सा० नमस्कार विनंति उपरी येथील क्षेम ता० छ० २५ जिल्हेज गुरुवार ऐकादशी मुकाम औरं- गाबाद स्वामींच्या कृपावलोकनेंकरून यथास्थित असे विशेष पुण्याहून स्वार जाहलियावर आमदानगरचे मुकाम तीर्थस्वरूप राजश्री रायांजवळ पावलों. नौसरजंगाकडील बोलीचा बिघाड जाहला, यामुळे आज दोन अडीच महिने गंगातीरींच त्याचें आमचें फिरणें जाहलें. पोटाची ओढ सीमेपरती. जोंधळे मात्र रानांत होते, त्यामुळे गुजरान झाली. बिघाड झाला तो तैसाच राहूं देऊन आलें तर मागें कटाक्ष राहील तो कार्याचा नाहीं. यास्तव मेहेनत, पोटास पैसा नसतां करणें तैसी कमाल, स्वामींचा आ- शीर्वाद मस्तकी आहे त्या बळें, करून मोंगल विचारावर आणून पहिले जहागीर द्यावयाची बोली होती त्याप्रमाणे करार करून घेतली आणि सलूख केला. पुढे त्यांणी आह्मीं एका विचारें चालून मुलुखाचा बंदो- बस्त दुतर्फा उत्तमप्रकारें चालवावा ऐसा सिद्धांत करून तीर्थरूप राजश्री राऊ स्वार होऊन हिंदुस्थानास गेले. आझांस आग्रह करून शहर पा , १ छ० २५ जिल्हेज गुरुवार : - ता० १३ मार्च इ. स. १७४०. २ निजाम दक्षिणेत नाहीं असे पाहून बाजीरावांनी त्याचा पुत्र नासिरजंग ह्यावर स्वारी केली. उभयतांच्या बऱ्याच झटापटी झाल्या. चिमाजी आपा २० जिल्काद ह्मणजे ता० ८ फेब्रुवारी इ. स. १७४० रोजी पुण्याहून निघून अह मदनगर येथे बाजीरावांस मिळाले. छ० १५ जिल्हेज रोजी बाजीरावांची व मो- गलाची वरखेड येथे भेट होऊन बाजीराव हिंदुस्थानच्या स्वारीस गेले. आपा नासिरजंगाच्या आग्रहास्तव औरंगाबादेस गेले. तेथे त्यांचा फार सत्कार होऊन ते छ० १६ मोहरम ह्मणजे ता० १ एप्रिल इ. स. १७४० रोजी परत आले. ग्रांटडफ ह्मणतात की मुंगी पैठण येथे मोंगलाशीं तह होऊन बाजीरावास हंडिया व खरगोण हे नर्मदेच्या कांठचे दोन प्रांत जहागीर मिळाले. तो हाच प्रसंग असावा.