पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. अभय थास्थित असे विशेष. सोमाजीबराबर स्वामींनों आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोषावाति जाहली. वसई फत्ते जाहली यावरून स्वामींनीं मजला कित्येक कृपा-उत्तरें गौरवून दाशरथी आदिकरून साक्ष-उपसाक्ष देऊन आज्ञा दिली; तर सर्व सामर्थ्य स्वामींचे आशी- र्वादाचें वसई दिल्ही, दिल्ही, दिल्ही, हीं उत्तरें त्रिवार स्वामींनीं लेख केलीं, व स्वामींनी पाटसास मज दर्शन दिले, तेथेंही वसईविशीं दिलें. तदनुरूप स्वामींनीं वसईवर सुदर्शन प्रेरून धर्मद्वेष्टे यांचा निःपात केला. येरवीं वसई सई होती असें [नवतें] व टोपीकर अग्निरूप होते. त्यांच्या सर्व शक्ति कुंठित करणें हा प्रताप स्वामींचा आह्मां मानवी लोकांचें हैं कृत्य नव्हे. श्री रघुनाथ [यांणीं] वानरांइस्तें समुद्रीं पाषाण तरवून लंकेशादिक त्रिकुटाचळाचें मर्दन केलें, तैसेंच श्रीकृष्ण यादवांहस्तें म्लेंछादि दैत्यांचें निर्दळण केले, त्याचप्र- कारें पाश्चात्यांचे उपमर्दन स्वामींनी करून वसईत ध्वजारोहण केलें. स्वामी मूर्तिमंत ईश्वररूप आहेत. स्वामींचा प्रताप कर्तृत्व वर्णावयास आमची बुद्धि नाही. प्रापंचिक विचारें स्वामींनीं मज महत्त्व देऊन आज्ञा दिली तर हे सर्व भूषण स्वामींचं आहे. मी स्वामींचा असें. पुतळ्या पाठविल्या त्या निफांसी आहेत. त्यांस फांसे करावयास सोनें तोळे पांच पाठविणें ह्मणून आज्ञा, त्याजवरून सदरहू पांच तोळे सोनें सोमाजीबराबर पाठविले आहे. ८२ लक्ष्मणराव याजबाबत सातशे रुपये आक्षी पुण्यास येऊन सेवेसी पाठवून देऊं. १ सोमाजी:- स्वानींचा नोकर. मोतें दररुपायास मोतीं एक १ प्रमाणें मोर्ती सव्वाशे पाठविणें झणून आज्ञा. त्यास येथें मोतीं नाहीत. स्वामींचे आज्ञेप्रमाणें पु. ण्यास खरीदी करून पाठवावयाशीं लिहिले आहे. मोतीं मिळाली तर पाठवितील मोतीं न मिळत तर सव्वारों रुपये सेवेसी पाठवितील. .