पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१ [ लेखांक ५३] श्री. श्रीमंत महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज चिमणाजी बल्लाळ विज्ञापना येथील वर्तमान तागाईत वैशाख वद्य १ पावेतों महाराजांचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष. स्वामींचे आज्ञेप्रमाणें श्रीनिवास केदार याजसमागमें पुतळ्या १२५ व रुपये १२५ एकूण सवारों पुतळ्या व सवारों रुपये पाठविले आहेत. सेवेसी प्रविष्ट जाहलियाचें उत्तर सादर जाहले पाहिजे; व सर्व स्वामींच्या आशीर्वादेंकरून फत्ते जाहलें याचें वृत्त सविस्तर काल लेहून सेवेसी विनंतीपत्र पाठविलें आहे. ते पुण्याहून रा० अंताजी नारायण यांणीं स्वामींचे सेवेसी पावतें केलेंच असेल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. पैवस्ती चंद्र २४ सफर सन तिसा सलासीन. - [लेखांक ५४ ] श्री. श्रीमन्महाराज श्री परमहंस बावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल तागाईत ज्येष्ठ बहुल पैष्ठी पर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून य- - १ वैशाख वद्य १: - ता० १३ मे इ. स. १७३९ रविवार. ह्या पत्रांत लिहिले आहे कीं वसई फत्ते जाहल्याचें सविस्तर वृत्त काल पाठविले आहे. अर्थात् तें वरील पत्र होय. परंतु त्यावर मिति प्रतिपदाच दिली आहे, व ह्याही पत्रांत प्रतिपदाच लिहिली आहे. मोडकांच्या जंत्रींत मुळींच वद्य प्रतिपदेचा क्षय आहे. त्यावरून मिति घालण्यांत चूक झाली असे दिसतें. वरील पत्राच्या दुसरे दिवशीं जर हैं पत्र लिहिले आहे तर ह्याची ता० १४ मे इ. स. १७३९ सोमवार ही मिति असली पाहिजे. २ ज्येष्ठ बहुल पष्ठी:- ता० १५ जून इ. स. १७३९ शुक्रवार. लेखांक ५२ व ५३ हीं दोन पत्रे चिमाजी आपांकडून गेल्यानंतर स्वामींचें जे अभिनंदनपर उत्तर आले त्याचें हें प्रत्युत्तर होय. ६