पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० " अंश, स्वामींनीं वसई “दिल्ही, दिल्ही, दिल्ही, ” त्रिवार लिहिलें ते शब्द अन्यथा कसे होतील. वरकड वसईची गोष्ट मानवी लोकांनीं ह्मणावी ऐसें नाहीं. वसई स्वामींचे आशीर्वादें फत्ते जाहली. श्रीचें सुदर्शन धर्मद्वेटे यांचे मस्तकीं वज्रप्रहार होऊन टोपीकर म्लानत्व पा वले. अन्यथा वसई सही न होती. फिरंगी आगीचा पुतळा होता! स्वामींचे कर्तृत्वास पार नाहीं. स्वामींची महिमा स्वामी जाणत. आह्मां मानवी लोकांस काय कळे ? वसई फत्ते होतांच सवासें पुतळ्या पाठवून देणें व श्री भुलेश्वरास सवासें रुपयांचा मुगुट घातला ह्मणून आज्ञा केली, याजवरून स्वामींचे आज्ञेप्रमाणें वसई फत्ते होतांच श्रीनिवास केदार याजबरोबर पुतळ्या सवासें व श्री भुलोबास मुगुट सवासें रुपयांचा घातला ते रुपये १२५ सवास स्वामींचे सेवेसी पाठविले आहेत. प्र विष्ट होतील. आझी लेंकरें स्वामींची असो. सर्वप्रकारें कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. स्वामींचे चरणाव्यतिरिक्त दुसरें दैवत आह्मांस काय आहे ? (खास दस्तुर )" सारांश स्वामींच्या आशीर्वादें व दंडाच्या प्रताप कार्य सिद्धीतें पावले असे. स्वामींचा महिमा आझी वर्णावयास सामर्थ्य धरीत नाहीं. श्रीनिवास केदार पुतळ्या व रुपये देऊन रवाना केले आहेत. लौकरच पावतील वर्तमान त्वरेनें विदित व्हावें यास्तव हें पत्र पुढें रवाना केलें असे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.* व . ह्रीं शेवटची वाक्यें खुद्द चिमाजी आपांच्या हातची आहेत. ह्या पत्रांत वसईच्या लढाईचे साद्यंत वर्णन दिले आहे. ते अगदीं निष्पक्षपातपणाचें असल्या मुळे त्याचा व पोर्तुगीज लोकांनी लिहिलेल्या वर्णनाचा उत्तम मेळ पडतो. ह्या युद्धांत पोर्तुगीज सेनापति Silveira de Menezes हा मृत्यु पावला. व पोर्तु- गीज लोकांचे ८०० लोक पडले. त्यांचा पूर्ण पराभव झाल्यानंतर Captain de Souza Pereira ह्या पोर्तुगीज अधिकाऱ्यानें चिमाजी आपांस कौल देऊन वसई सोडून दिली. ह्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीज लोकांशीं फारच थोरपणाचें चर्तन केले. ह्या युद्धाची सायंत हकीकत स्वामींच्या चरित्रांत दिली आहे.