पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९ वैशाख शुद्ध संतमी गुरुवारी उजवे बाजूचा सुरुंग उडविला. तेच समयीं लोक जाऊन बुरूज अर्धा उडाला त्याजवरी चढले. फिरंगी यांणीं सफेलीच्या आंतून मेढा घालून, पोतीं भरून, तोफा जोडून तयार होतांच तेथें फिरंगीं बोलावून हाके गरनाळाच्या दारूच्या फत्यास आग लावून मार केला, व रेजगिरीचा मार सीमेपरता केला. लोकांवरी अग्नीचा पर्जन्य करून भाजून काढिलें. तथापि स्वामींचें अभयआशीर्वा- दाचें वज्रकवच लोकांचे अंगीं होतें, तेणेंकरून अगीची तमा न धरितां लोकांनी हत्यार बरे बजेनें केलें. फिरंगी यांणीं मर्दुमी शिपाईगिरी ह्मणावी तशी केली. त्याचप्रमाणे इकडील लोकांनीं भारती युद्धाप्र माणें युद्ध केलें. यामागे युद्धे बहुत जाहलीं; परंतु ह्या लढाईस जोडाच नाहीं. सर्व स्वामींचा आशीर्वाद लोक बुरूज सोडीनात से जाहले, तेव्हां स्वामीच्या दंडप्रहारेंकरून फिरंगी धर्मद्वेष्टे बेहिंमत हो- ऊन अष्टमीस प्रहर दिवसास कौलास आले. कौल घेतला. आठा दिवसांत कबिला मुद्धां झाडून जातोसें करार केले. त्याजवरून मार महकूब केला. फिरंगी यांणीं कबिले वस्तभाव गलबतांत भरली. काल वैशाख शुद्ध पौर्णिमेसे फिरंगी झाडून गेला. स्वामींचे पुण्यकरून जागा फत्ते जाहली. लष्करचे व हशमाचे लोक सुरंगांनीं उडाले व जायां ठार अजमासे पांच हजार किंबहुना विशेष होतील. तैसेंच फिरंगी याचे सात आठसें माणूस ठार व या निराळे जखमी जाहले. भारती युद्धा- प्रमाणें [युद्ध] जाहले. वसई बाका जागा. पश्चिमेकडून दक्षिणेकडे खाडी. पूर्वेकडे खाजण चिखल. तिहींकडून किमपि इलाज नाहीं. एके उत्त- रेकडून उपाय. तिकडेही रेती, घर नाहीं. स्वामी साक्षात् ईश्वराचा सप्तमीः - ता० ३ मे इ. स. १७३९ गुरुवार १ वैशाख शुद्ध २ अष्टमी: ता० ४ मे इ. स. १७३९ शुक्रवार - ३ वैशाख शुद्ध पौर्णिमा:- ता० १२ मे इ. स. १७३९ शनिवार मे