पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येणेप्रमाणे हिंदुस्थानांतील बराच प्रदेश पर्यटण केल्यामुळे स्वामींस देशस्थितीचें उत्कृष्ट ज्ञान झाले. प्रवासाच्या योगाने बहुविध तीर्थे, निर नेराळीं देवस्थानें, नानाप्रकारचे सृष्टिसौंदर्यालंकृत प्रदेश, विविध राज्यपद्धति, आणि निरनिराळे लोकाचार दृष्टीस पडून मनावर विशिष्ट संस्कार होतो व बुद्धीस प्रशस्तपणा प्राप्त होतो. तो सर्व ब्रह्मद्रस्वामींस सहज झाला असेल ह्यांत आश्चर्य नाहीं. , , स्वामींच्या तीर्थयात्रा संपून ते साताराप्रांती आले त्या वेळचा काळ स्वामीं च्या टिपणावरून अदमासानें इ० स० १६८० नंतरचा असावा असे दिसते. छत्रपति संभाजीमहाराज ह्यांचा औरंगजेब बादशाहानें वध केल्यानंतर महारा- ष्ट्रामध्ये पुनः मोंगलांचे वर्चस्व झाले. त्यामुळे राजाराम महाराजांस चंदीस जाऊन, तेथून महाराष्ट्रराज्यसूत्रे चालवून, मोंगलांच्या ताव्यांतून स्वराज्य सोड- विण्याचा यत्न करणे भाग पडले. ह्या संकटप्रचुर कालामध्यें ब्रह्मद्रस्वामी सा ताराप्रांती गुप्तरूपानें आले असावेत व त्यांना तेथील परिस्थिति निर्भयपणे वास करण्यास प्रतिकूल वाटली असावी असे दिसते. त्यामुळे त्यांनी सर्व देशस्थिति अवलोकन करून सह्याद्रि उतरून कोंकणप्रांतांत गमन केले. नंतर ते चिपळुणाजवळ मौजे पेढें नामक गांवीं श्री परशुरामाचें प्राचीन व रम्य देवस्थान आहे तेथें आले. ह्या देवस्थानाच्या आसमंतात् दाट जंगल असून ते स्थान निवांत व निर्जन असे असल्यामुळे साधुजनांच्या तपश्चर्येस योग्य आहे असे त्यांस वाटलं. ह्या स्थानाच्या पश्चिमेस धामणी सोनगांवच्या रानांत डोंगरामध्ये असलेली एक सुंदर गुंफा व तेथें अखंड वाहत असलेला पाण्याचा सुंदर झरा पाहून स्वामींनीं ती जागा पसंत केली, व तेथें कांहीं वर्षे तपश्चर्या करण्यांत घालविलीं. परंतु पुष्कळ दिवस स्वामींची विभूति कोणाच्या दृष्टीस पडली नाहीं. मौजे पेढें येथे राहणारा बाळ गौळी नामक एक इसम आपलीं गुरे धामणी सोनगांवच्या रानामध्ये नेऊन चारीत असे. तो स्वामींच्या गुंफेजवळ एके दिवशीं आकस्मिक गेला व दैववशात् त्यास स्वामींचें दर्शन झालें. स्वामीं- सारखा महातपस्वी साधु दृष्टीस पडल्यामुळे त्यास फार समाधान वाटलें व त्याची त्यांवर फार निष्ठा बसली. स्वामींनी त्यास आपली माहिती कोणास सांगूं नये ह्मणून ताकीद केली. त्याप्रमाणे कित्येक दिवसपर्यंत त्यानें स्वामींच्या दर्शनाची