पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ सीम ह्मणावी तैसी. तथापि स्वामींचा आशीर्वाद उदंड है सबल शस्त्र आझांजवळ, त्याचे प्रतापें इकडून तोफ लागू करून फिरंगी याच्या तोफा मना केल्या. सफेल सोडून लेश केली. वसई जागा बाका, बुलंद, सुरुंगाचा उपाय नाहीं. परंतु स्वामींच्या कृपाकटाक्षे सुरुंग चाल- वून दोहीं बाजूंनीं खांबावरती तख्तपोसी, त्यावर दोन अडीच हात रेती टाकून, दद्दा सुरुंग नेऊन पोहोंचवून, दोनशें पाथरवट लावून मोठेमोठे चिरे फोडून, सुरुंगाचे बुधलियास जागा करून, वैशाख शुद्ध पंचमीस सकल सिद्धता करून, लोकांस बाजू वांटून देऊन, नगारियाची इशारत करून, सुरुंग उडतांच सर्वोनी येलगारास उठावें, बुरुजावर चढावें, शिड्या ठेवून चढावें, ऐसा करार करून, वैशाख शुद्ध पेष्ठी बुधवारी दोन घटिका दिवसास प्रातःकालचा समय येतांच सुरुंगास बत्त्या दिल्या. डावे बाजूचे सुरुंग कांहीं उडोन कांहीं उडणें होते, तोंच लोकांनीं उतावळी करून कोटावर चालोन घेतलें. तो दुसरे सुरुंग तेच बाजूनें उडाले. त्यांनीं लोक दडपले व जायां व ठार जाहले. तसेंच उजवे बाजूचे सुरुंग उडाले. एकदोन उडतांच बुरुजास वाट जाहलीसी देखून लोक वरते चढले. तो दुसरे सुरुंग उडाले. त्यांणीं वरते लोक चढले होते ते उडून गेले. लोक कसकरले. हिरमोड हो- ऊन काम थंड पडलें. फिरंगी यांणीं सांभाळून हाके [१] व गरनाळा व रेजगिरीचा मार न भूतो न भविष्यति केला. त्याणे लष्करचे लो- कांत व हशमांत अवसान राहिले नव्हतें. उजवे बाजूचा मातबर सुरंग राजश्री मल्हारजी होळकर याजकडील उडणें होता. त्याचा शोध क रून पुन्हां त्यांत बुधले घालून रंजक दुरुस्त करून लोकांची निवड केली. आणि सुरुंग उडतांच खामखां निशाणें चडवावीं असा करार करून - १ वैशाख शुद्ध पंचमी:- ता० १ मे इ. स. १७३९ मंगळवार. २ वैशाख शुद्ध षष्ठी:- ता० २ मे इ. स. १७३९ बुधवार.