पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७७ घेल त्याप्रमाणे होईल येविषयीं संशय नाहीं. स्वामींनीं कृपा करून अ भय उत्तरें देऊन वैसई दिली ह्मणोन आज्ञा केली तेव्हां वसई दिलीच. स्वामींचें अभय [ वचन ] पूर्ण चित्तांत धरून आज्ञेप्रमाणें शरीरद्वारा साहस करणें तें आझी सर्वही करीत असों तरी शिमगे पूर्णिमेअली- कडे वसईवर स्वामींचा ध्वजारोहण करण्यास स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ५२ ] श्री. - श्रीमंत महाराज श्री परमहंस बावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें कृतानेक सा० नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता० वैशाख बहुल प्रतिपदापर्यंत मुकाम वसई स्वामींचे आशीर्वादें- करून सुखरूप असों विशेष स्वामींचे अभयावरून वसईस मोर्चे माघ शुद्ध दशमीस लाविले. त्यादारभ्य मोर्चेच लाविले व धमधमे चार पांच बांधले. सुरुंग चालविले, जे जे उपाय स्थळ हस्तगत करावयाचे ते केले. फिरंगी यांणीं निराकरणाचे मंत्र पूर्वी युद्धप्रसंगी मोठ्या मोठ्या सुरांनीं केले. तद्न्यायें फिरंगी यांणीं सुरुंगावर व धमधम्यावर गर नाळा टाकिल्या. सुरुंग विच्छिन्न केले. पनाळे लावून पाणी सोडिलें. आगीचे बोंडे जळके टाकून त्यांवर तेल, दारू, राळ टाकून चार चार रोज डोंब राहीसारखा करी. बरकंदाजी व तोफजी फिरंगी याची निः- १ ह्या पत्रावरून असे दिसून येतें कीं, स्वामींनी चिमाजी आपास वसई दिल्ही असा, ती हस्तगत होण्यापूर्वीच, आशीर्वाद दिला होता; व त्याप्रमाणे शि मगेपूर्णिमेच्या आंत तेथें स्वामींचा ध्वज लावण्याचा त्यांचा विचार होता. - २ वैशाख बहुल प्रतिपदाः - ता० १३ मे इ. स. १७३९ रविवार. मोड- कांच्या जंत्रींत प्रतिपदेचा मुळींच क्षय दिसतो. R- ३ माघ शुद्ध दशमीः – ता० ७ जानेवारी इ. स. १७३९ बुधवार. ह्या दि- वशीं वसईस मोर्चे लाविले.