पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ करून जसें करणें तसें केले जाईल. तूर्त जागा फत्ते जाहल्याचें संतोष वृत्त तांतडीनें लिहिलें असे. जासूद चोहो दिवशीं शनवारीं तेथें पाव- तील. त्यास चित्तास येईल तें इनाम पोंचतें दिल्हें पाहिजे. कृपा केली पाहिजे हे विनंति. [ लेखांक ५० ] श्री. श्रीमंत श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसीः— विनंती सेवक चिमणाजी बल्लाळ कृतानेक विज्ञापना येथील क्षेम तागाईत माघ शुद्ध प्रतिपदा पावेतों स्वामींचे आशीर्वादेंकरून यथा- स्थित असे विशेष. माहिम, केळवें व शिरगांव व तारापूर व डाहाणू व नारगोळे व खतलवाड एकूण सात आठ जागीं स्वामीआशीर्वादें फत्ते जाहलें, वानरें व वेसावें व धारावी तीन स्थळें राहिलीं आहेत. तींही स्वामींच्या आशीर्वादेंकरून फत्ते होतीलच. सविस्तर वृत्त तीर्थ- रूप राजश्री राऊ यांणीं स्वामींस लेहून पाठविलेंच असेल. त्यावरून विदित जहालेंच असेल. सर्व महिमा स्वामींच्या आशीर्वादाचा आहे. तेणेंकरून जें होणें तें होतें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. - श्री. [ लेखांक ५१ ] श्रीमंत महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना तागाईत फा- ल्गुन शुद्ध षष्ठीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. तुझीं वसईवर लगट करून [जाणें]. शिमगे पूर्णिमेअलीकडे श्रीनें तुझांस वसई दिल्ही, ऐशियास स्वामी साक्षात्कार ईश्वराचा अंश आहेत. स्वामींचे मुखांतून नि १ माघ शुद्ध प्रतिपदा - ता० २९ जानेवारी इ.स. १७३९. २ फाल्गुन शुद्ध पष्ठी:- ता० ४ फेब्रुवारी इ. स. १७३९ रविवार. -