पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५ सरकारच्या निशाणाजवळ होते. गुतेकर व बाळोजी चंद्रराव होते. हुजरातच्या निशाणाच्या उजवेकडे मल्हारबाचीं निशाणें सारीं होतीं. तैसींच राणोजी भोंसले याचीं होतीं. त्यांणींही शर्थ करावयाची तैसी केली. कुसा अलीकडे सात आठ हात खंदक खोल होता. आठ हात रुंद होता. तो खंदक उतरोन जावें त्या उपरी कोटावरी चढावयासी बहुता प्रकारची अडचण होती. वरले लोकांनीं आंत मेढा कोटाशेजारीं तयार केला होता. त्यामुळे कोटावरीही चढल्यावरी दोन घटका तेथें तुंब पडला. तसेंच जागा जागा. शेवट पावेतों फिरंगी यांणी हिंमत सोडली नाहीं. हुकयाचा [१] व तोफांचा मार व बरकंदाजाचा मार सिमे- परतां. खाडीचे मध्यें माडी आहे तेथें आझी होतों. मल्हारबाचे पायास करट जाहलें आहे, त्यामुळे तेही एकटे आह्मांजवळ होते. सारें झुंज नजरेस पडलें. आमच्या लोकांमध्यें व मल्हारबाच्या लोकांमध्यें आंग्रे यांचेही लोक होते. राणोजी भोंसले यांणीं बरे वजेनें बाकोन घातलें. राजश्री बाजी भीवराव यांणींही बरेच वजेनें सीमेपरतें निशाण चाल- विलें. त्याचे मर्दुमीची सीमा लिद्दावी ऐसें नाहीं. हुजरातच्या मोर्च्याच्या डावे हातें गोविंद हरी होते. तेही बरे वजेनें पोंचले. राणबांनीं शिड्या तयार केल्या होत्या, तिकडे सुरुंग तयार नव्हता. ते जबरदस्तीनें खंदक उतरून शिड्या लावून चढलेच असतील. गोविंद हरीचे डावे हातीं बांडे होते. त्याचे पलीकडे यशवंतराव होते. त्याचे पलीकडे तुकोजी पवार. शेवटीं राणबा. तिकडील तपशीलवार वृत्त मागाहून लिहून पा टवूं. सारांश माणूसही सीमेपरते जायां झाले. नांवनिशी मागाहून तहकीक करून लिहून पाठवूं. सुभेदारही हशिमाचे लोक होते त्यांत शिरले होते. सारांश स्वामींचा पुण्यप्रताप थोर, तेणेंकरून जागा फत्ते जाहली असे. अद्याप लोक सारे गांवांतच आहेत. फिरंगी याचीं सारीं माणसें घरावीं ऐसी ताकीद केली आहे. जमा जाइलियावरि तहकीक ●