पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ लेखांक ४९ ] ७४ श्री. तीर्थस्वरूप राजश्री राऊ स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें कृतानेक सा० नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ताा छ० २४ सेवाल बुधवार प्रातःकाळचा सवा प्रहर दिवस मु॥ तारापूर यथास्थित असे विशेष. रात्रीं चार पांच सुरुंग मल्हारबा- कडून तयार जाहले. तैसेच हुजरातच्या सुरुंगाचे तीन फांटे एकाचे क रून कुसाखालीं नेले. तसेंच यशवंतराव पवार याकडीलही एक तयार जाहला. राणबाकडील तयार जाला नाहीं. तयार जाहला त्यास आज दोन घटका दिवसास बत्ती दिल्ही. सारे लष्करचे लहान थोर माणूस रात्रींचेच खाडींतून उतरोन मोर्च्याचे पाठीमागें जमा करून बसविलें होतें. सुरुंग एकामागें एक अंतर करून उडाले. सरकारच्या सुरुंगाचें खिंडार मोठे पडलें. तैसेंच मल्हारबाचा खासा सुरंग बुरुजाखालीं होता तेथेंही खिंडार मोठे पडलें. त्याच्या उजव्या हाताकडे दुसरे सुरुंग होते तेथेंही थोडीं बहुत खिंडारें पडली. त्याच्या उजवीकडे हशमाच्या लोकांनीं कोटासच मर्दाम (नें) शिडी टेंकून वरते चढले. पुढे धार- करी होता तो वर चढल्यावर, वरी गोळी लागून, वरून खालीं भुईवरी पडला. त्याचे पाठीमागें दुसरा चढला, तोही वरून पडला. तेव्हां क्षण- भर शिडी रिकामी होती. फिरोन लोकांनीं लगट करून वरते चढले. वरी लोकांनीं मारामारीची शर्थ केली. हुजरातचे निशाणाजवळ राजश्री वाजी भीवराव व रामचंद्र हरी होते व सारे नामांकित लोक तितके होते. बरे बजेनें चालोन गेले. तैसेंच हशमांपैकींही तीनेकसें माणूस - १ छ० २४ सवाल बुधवारः - ता० २४ जानेवारी इ. स. १७३९. - २ तारापूरः – येथें पोर्तुगीज लोकांचें व मराठ्यांचे १७३९ सालीं युद्ध झालें त्याचें वर्णन ह्या पत्रांत आहे. ह्या युद्धामध्ये पोर्तुगीज सेनापति Don Francis de Alarcao हा होता.