पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७३ [लेखांक ४८ ] श्री. श्रीमंत महाराज राजश्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसीः - - अपत्यें चिमाजीनें कृतानेक सा० नमस्कार विज्ञापना येथील कुशल माघ शुद्ध द्वितीया पर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष तीर्थरूप राजश्री रायांकडील पत्रे स्वामींस आलीं तींच बजिन्नस पाठविलीं आहेत त्यांजवरून विदित होईल. सारांश स्वामींचा आशीर्वाद तीर्थरूपांचे मस्तकीं आहे. तत्प्रभावेंकरून म्लेंच्छ महागवेंकरून आला तो गर्वहत जाइला; समूळ अविलंबेंच बुडाल्याचें वृत्त येईल तें मागाहून सेवेसी लिहून पाठवितों. औरंगाबादेची फौज त्याचे कुमकेस जाणार. शहर सोडून फुलदरीस आली आहे. स्वामींच्या आशीर्वादें हे फौजेचा निःपात इकडेच होय असा आशीर्वाद दिल्हा पाहिजे. होतें तें स्वा- मींच्या आशीर्वादें होतें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. १ माघ शुद्ध द्वितीयाः - ता० ११ जानेवारी इ. स. १७३८ बुधवार - २ बाजीरावांकडून जी पत्रे येत तीं चिमाजी आपा स्वामींच्या अवलोकना- साठीं स्वामींकडे पाठवीत असत. बाजीरावांच्या पत्रांमध्यें चिमाजी आपांच्या नां वची लेखांक ३३|३४|३५ हीं पत्रे आहेत हीं स्वामींच्या अवलोकनासाठी चिमाजी आपांकडून गेलेलीं होत. ३ म्लेच्छ: – निजामउल्मुलुक. ४ औरंगाबादेची फौजः - ही निजामाची दक्षिणेतील फौज. हिला पायबंद - - द्यावा ह्मणून बाजीरावांनी लिहिलें होतें ( लेखांक ३३), त्याप्रमाणे चिमाजी आपांनीं त्या फौजेस उत्तरेस जाऊं न देण्याचा निश्चय केला होता. - ५ फुलदरी: - असें नांव चिमाजी आपा आपल्या पत्रांत देतात; परंतु फुलमरी असें नांव पाहिजे. फुलमरी हें गांव औरंगावादेजवळ आहे.