पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ गेले. तेथून पत्रे आलीं. सांप्रत वोडैशास पावले असतील. राजश्री म व्हारजी होळकर व राणोजी शिंदे येऊन भेटलेच असतील, वोडशाचा कारभार उरकोन आगऱ्यावरून दिल्ली समीप एक वेळ जावें ऐसा त्यांचा बेत आहे. अथवा यमुना उतरून अंतरवेदींत जावें हाही एक विचार आहे. स्वामींच्या आशीर्वादें सर्व मनोरथ सिद्धीस जातील. आमचा हेत वारणाशीस जावें असा आहे. तोही स्वामींच्या आशीर्वादें घडेल हे विज्ञापना. [ लेखांक ४७] श्री. श्रीमंत परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ताा छ १० जिल्हेज ऐकादशी गुरुवार मुकाम ठाणें यथास्थित असे विशेष. स्वामींच्या आशीर्वादेंकरून पुण्याहून स्वार होऊन ठाणें हस्तगत केलें. वानरें, वेसावें, बेलापूर हे जागे फार बळकट आहेत. तेथीलही उपाय करूं जें होणें तें स्वामींच्या आशीर्वादें होईल. वसई- जवळ फौज जाऊन बसली आहे. स्वामींस विदित व्हावें यास्तव लि- हिले असे निरंतर आशीर्वादपत्र पाठवावयास आज्ञा केली पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. - १ वोडसें: -ज्यास सांप्रत वोरछा किंवा तेहरी असें ह्मणतात त्यास मराठी कागदपत्रांतून वोडसें असें नांव दिलेले आढळते. हे बुंदेलखंडांतील एक प्राचीन संस्थान असून ते झांशीच्या दक्षिणेस आठ मैल आहे. २ मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे ह्यांच्या व पेशव्यांच्या भेटी छ० १५ रमजान ता० ६ जानेवारी इ. स. १७३७ रोज गुरुवार ह्या दिवशीं भेलसे पर- गण्यांत वेत्रवती नदीच्या कांठी झाल्या. ३ छ० १० जिल्हेज एकादशी गुरुवारः - ३१ मार्च इ. स. १७३७. -