पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७१ श्री भुलेश्वराचें काम आपण पाहिलें नाहीं तें तुझीं पहावें; व गांवांतील तळ्यास काम लाविलें आहे तेंही जाऊन पाहून कारखान्याचे लोकांचें समाधान करावें" ह्मणून स्वामींनीं आज्ञा केली, ऐसीयास स्वामी चिरंजीवी, भार्गवाचा अवतार आहेत. यास्तव आरोग्यताही अविलंबेंच होईल. आरोग्यतेचें वर्तमान श्रवण होय तावत्काल संतोष नाहीं. या निमित्य राजश्री बाबूराव नारायण यांस स्वामींचे सेवेसी पाठविले आहेत. आठदहा दिवस स्वामींचे पायांपासीं राहून दिन प्रतिदिन आरोग्यतेचें वर्तमान लिहितील. तेणेंकरून संतोष होत जाईल. वरकड कारकुनांस मजमागे तुझां वेगळें कोणी नाहीं ह्मणोन आज्ञा केली, तरी स्वामींचे आज्ञेपेक्षां विशेष काय आहे? त्यांच्या परामर्षास अंतर हो- णार नाहीं. श्री भुलेश्वरास जाऊन तेथील इमारतीचा व तळ्याचे इमा- रतीचा परामर्ष करून तेथें कामावर लोक आहेत त्यांचेंही समाधान करणें तें रीतीनें करितों. आपली व्यथा कठिण आहे, द्रव्याचें सार्थक करणें ह्मणोन पूर्वी पत्र आर्ले त्यांत लिहिलें होतें. ऐसीयास आज पावेतों लक्षावधि द्रव्य स्वामींनीं मेळविले त्याचें सार्थकच केलें, व पुढेही स्वा- मींच्या आशीर्वादें सार्थकच होईल. वरकड यशाचा वांटा तुझांस दिल्हा ह्मणून स्वामींनी आज्ञा केली, तर यश, कीर्ति, लक्ष्मी जे आहे ते स्वा- मींच्या आशीर्वादाचीच आहे. तीर्थरूप राजश्री रोऊ नर्मदा उतरोन ● १ श्रीभुलेश्वराचें कामः – हें देवालय जेजुरीजवळ माळशिरस गांवीं आहे. माळशिरस तर्फ कडेपठार प्रांत पुणे अर्से पूर्वी मोडत असे. आतां पुरंदर तालु क्यांत तें गांव आहे. भुलेश्वराचें देवालय इ. स. १७३७ मध्ये स्वामींनी बांधिलें हे ह्यावरून सिद्ध होतें. ह्या देवालयाचा कै० तुकोजीराव होळकरांनीं जीणों- द्धार केला. २ बाजीराव नर्मदा उतरोन गेले ह्मणून चिमाजी आपांनी लिहिले आहे ती पेशव्यांची इ. स. १७३७ सालची उत्तर हिंदुस्थानांतील स्वारी होय. ह्या स्वा रीस बाजीराव छ० २९ रजब ह्मणजे ता० २२ नोव्हेंबर इ. स. १७३६ रोज सोमवार ह्या दिवशीं निघाले.