पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● स्कार विनंति येथील कुशल ताा भाद्रपद वद्य प्रतिपदा मंदवार पावेतों पुण्यास सुखरूप असों विशेष. या प्रांत यंदा पर्जन्य आजपावेतों पडला नाहीं. प्रजा बहुत श्रमी झाली. हें वर्तमान तीर्थरूप राजश्री राऊ यांणीं स्वामींस निवेदन केले. त्यावरून “स्वामी कृपावंत होऊन प्रस्तुत श्री जेजुरी येथील तळ्यावर येऊन दोन पायली सराटे आसनास घा- लून अनुष्ठानास बसलेत आहां. जेव्हां पर्जन्य पडेल तेव्हां गोमूत्र घेईन, असा निश्चय केला आहे." हें वर्तमान बापुजी महादेव याणीं राजश्री बापुजीपंतास लिहिलें, त्यावरून सविस्तर कळलें. ऐसीयास स्वामी भृगु अवतार आहेत. जो निश्चय केला तो श्री सिद्धीस नेईल. पर्जन्यही बहुत पडेल ह्यांत संदेह नाहीं. पिवळ्या सकलादेविस आज्ञा केली होती, त्यावरून साडेतीन गज पिंवळी सकलाद सेवेसी पाठविली आहे. प्रविष्ट जाहलियाचा जाब पाठवावयासी आज्ञा केली पाहिजे हे विज्ञापना. [ लेखांक ४६] श्री. श्रीमंत परमहंस स्वामी स्वामींचे सेवेसीः अपत्यें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता पौष वद्य द्वादशी रविवार मुक्काम अलेगांव तर्फ पाटस स्वामींच्या आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जार्ले, “शरीरों फार बरें वाटत नाहीं. मज मांगें सर्व तुमचे स्वाधीन आहे. कारकून पोरें आहेत, यांचें सर्वप्रकारें चालवावें. व . - १ भाद्रपद वद्य प्रतिपदा मंदवारः - ता० २३ आगष्ट इ. स. १७३५ शनि- वार, किंवा ता० १९ आगष्ट इ. स. १७३८ शनिवार, अशा दोन तारखा ह्या मितीस येतात. ह्यांपैकी खरी कोणती हेंही निश्चित करितां येत नाहीं. २ पौष वद्य द्वादशी रविवारः - ता० १६ जानेवारी इ.स. १७३७. - ३ अलेगांव तर्फ पाटसः- हे पुणे जिल्ह्यांत भिमथडी तालुक्यांत आहे. -