पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९ हादूर युद्धास आला. स्वामींच्या आशीर्वादानें त्यास पराभवातें पाठविलें. सांप्रत फिरोन देशास आलों. आजच पुण्यास आलों तीर्थरूप राजश्री राऊ बुंदेलखंडांत छत्रसालाच्या साह्यास गेले आहेत. महमदखान बं गसाचें यांचें युद्ध मांडले आहे. स्वामींचा आशीर्वाद मस्तकीं आहे तेणेंकरून तेही यश घेऊन लौकरच माघारे येतील. स्वामींचें आशी- र्वादपत्र आल्यानें फार संतोष होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. पौ छ० ५ जिल्काद सन सलासीन. ● [ लेखांक ४४ ] श्री. श्रीमंत परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ताा चैत्र वद्य तृतीया बुधवार मुक्काम नजीक ग्वाल्हेर पाठीमागें येथून दहा कोस आहे. स्वामींच्या कृपावलोकनेंकरून यथास्थित असे. स्वामींच्या आशीर्वादेंकरून सर्व गोष्टी उत्तम आहेत. मुलुख मात्र वोस होऊन य मुनेपलीकडे गेला. कोठें माणूस नजरेस पडत नाहीं. स्वामींस वर्तमान कळावें ह्मणून लिहिले असे. स्वामींनीं आशीर्वादपत्र वरचेवर पाठ- विण्याची आज्ञा केली पाहिजे हे विज्ञापना. श्री. [लेखांक ४५ ] - श्रीमंत परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज चिमणाजी बल्लाळ चरणांवरी मस्तक ठेवून सा० नम- - - १ चैत्र वद्य तृतीया बुधवारः – ह्या मितीस ता० १४ एप्रिल इ. स. १७३१, किंवा ता० १० एप्रिल इ. स. १७३४, किंवा ता० ६ एप्रिल इ. स. १७३७ अशा तीन तारखा पडतात. ह्यांपैकी इ. स. १७३१ किंवा १७३४ मधील हे पत्र असूं शकेल. कारण डभोईची लढाई झाल्यानंतर आपा उत्तरेकडे स्वारीस गेले होते. त्याचप्रमाणे इ. स. १७३४ मध्ये पिलाजीराव जाधवाबरोबर स्वारीस गेले होते. परंतु ह्याचा निर्णय बरोबर होत नाहीं.