पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याप्रमाणें सद्गुरुप्राप्तीमुळे ब्रकेंद्रस्वामी ह्यांची स्थिति होऊन ते शुद्ध ब्रह्मज्ञानाचे पूर्ण अधिकारी झाले; आणि श्री समर्थांनी झटल्याप्रमाणेंचः - - अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य निष्ठेचें भजन | तेथें बहुत भक्तजन । विश्रांति पावती ॥ १ ॥ ह्याप्रमाणे बहुत भक्तजनांच्या विश्रांतीचे मुख्यस्थान होऊन राहिले, हे पुढील चरित्रकथेवरून वाचकांच्या लक्षांत येईल. असो. व काशीक्षेत्री सद्गुरुमुखांतून ज्ञानप्राप्ति करून घेतल्यानंतर ब्रह्मद्रस्वामी ह्यांनीं उत्तरमानस व दक्षिणमानस तीर्थयात्रा करण्याचा संकल्प केला. ते आपल्या गुरूंची आज्ञा घेऊन निरनिराळीं तीर्थे व सुप्रसिद्ध स्थळे अवलोकन करीत बद्री- नारायणापर्यंत गेले. तेथील अप्रतिम सृष्टिसौंदर्य व अपूर्व स्थानमाहात्म्य पाहून त्यांस अत्यंत समाधान झालें. तदनंतर ते पुनः वाराणशीस परत आले व तेथें त्यांनीं आपल्या गुरूंचे मोठ्या भक्तिभावानें दर्शन घेतलें. नंतर कांहीं दिवस तेथें राहून दक्षिणमानस यात्रा करण्याच्या उद्देशानें त्यांनीं काशीक्षेत्राचा शेवटचा निरोप घेतला. तेथून ते श्री ओढ्या जगन्नाथाकडे येऊन पूर्व किनाऱ्यानें श्री रामेश्वर क्षेत्रीं गेले. काशीपासून रामेश्वरापर्यंत सर्व तीर्थक्षेत्रादि पवित्र स्थळें अवलोकन करून ते कर्नाटक प्रांतांतून महाराष्ट्रदेशामध्यें श्री कृष्णातीरीं आले. १. स्वामी सर्व तीर्थयात्रा संपवून महाराष्ट्रदेशांत आले त्या वेळी सर्वत्र मोंग- लाई अंमल असून राजारामाची बायको ताराबाई ही रांगणा किल्ल्यावर होती व सातारा वगैरे कांहीं किल्ले तिच्या ताब्यांत होते. कन्हाड, वाई आदि ठाण मों- गलांकडे होती. त्यामुळे स्वामींचें साताराप्रांत चित्त न रमून ते कोंकणांत चिप- ळूण प्रांतें गेले. तेथें वारा वर्षे गुप्त राहून नंतर ते प्रगट झाले. असे 'काव्येतिहास- संग्रहां' तील बखरीमध्ये लिहिले आहे. परंतु स्वामींच्या हालचालींची याद उप- लब्ध झाली आहे तिच्यावरून इ० स० १६९८ मध्ये तपश्चर्या करून स्वामी परशुराम प्रगट झाले असे दिसून येतें. त्यापूर्वी बारा वर्षे ह्मणजे इ० स०१६८६ मध्ये स्वामी महाराष्ट्र देशामध्ये येऊन गेले असावेत असे वाटतें. ह्या वेळीं बहुतेक मोंगली अंमल झाला असून राजाराम महाराज चंदी प्रांतास गेले होते. ह्या समय स्वामींचे राहणे महाराष्ट्र देशीं न व्हावें हें अगर्दी साहजिक दिसतें. • काव्येतिहाससंग्रह 'कारांनी ह्या स्वामींच्या प्रथम आगमनाचें वर्ष ३० स० १७०७ हे धरिलें आहे परंतु तें बरोबर जमत नाहीं.