पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ ईचें काम अद्यापि झालें नाहीं. आपले आशीर्वादेंकरून उत्तमच होईल, सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. चिमणाजी आपा. श्री. [ लेखांक ४३] श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चिमाजीनें कृतानेक सा० नमस्कार येथील क्षेम ता। वैशाख वद्य तृतीया पावेतों स्वामींच्या आशीर्वादेंकरून सुखरूप असों विशेष. तीर्थरूप राजश्री रायांनीं माळवा प्रांतांत पाठविले होतें. त्यास दयाब- पत्रे पाठविलीं. ग्रांटडफ ह्मणतात की शाहू महाराजांस व बाजीरावांसही त्यानक- डून पत्रे आली होती. हीं पत्र फार महत्वाची असली पाहिजेत. बाजीराव साहे- बांनी महमदशहास पुनः तक्त प्राप्त झाले ह्मणून १०१ मोहरा नजर पाठवून एक अभिनंदनपर पत्र पाठविलें होतें. त्याचा स्वीकार करून बादशहानें पेशव्यांस एक बहुमूल्य पोषाक पाठविला व पूर्वी दिलेले अधिकार व जहागीर वगैरे कायम केलीं. बादशहाची फर्मान बाजीरावांस छ० २४ सफर (ता० २२ मे १० स० १७३९) रोजी मुकाम कसवे शहापूर परगणे जैनाबाद येथे मिळाली असा दाखला सांपडतो. १ वैशाख वद्य तृतीयाः - ता० ४ मे इ. स. १७२९ रविवार. -- २ दयावहादूरः – हा माळव्याचा सुभेदार राजा गिरिधर याचा पुतण्या राजा गिरिधर यासीं उदाजी पवार व चिमणाजी पंडित ह्यांनी युद्ध करून इ.स. १७२९ मध्ये ठार मारिलें (ग्रांटडफ). त्यानंतर त्याचे जागी दयाबहादूर ह्याची दिल्लीदरवारांतून योजना झाली. त्यावर चिमाजी आपांनी स्वारी करून त्याचा धारेजवळ तेरळे (Terlah) येथे पराभव केला. ह्या युद्धांत तो मारला गेला असे ग्रांटडफ ह्मणतात, परंतु त्याचा सन १७३२ असा पुढे देतात. चिमाजी आ पांच्या पत्रांत दयावहादूर मारल्याचा उल्लेख नाहीं. ह्याच युद्धांत तो मारला गेला असे मानावें तर हे पत्र इ. स. १७२९ मधील असून आपा छ० १६ सवाल ( ता० ४ मे इ. स. १७२९) रोजी वरील स्वारी करून पुण्यास आले हे सिद्ध आहे. तेव्हां १७३२ है साल बरोबर जमत नाहीं. -