पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[लेखांक ४२ ] श्री. श्रीमत् परमहंस श्री स्वामींचे सेवेसी:- - चरणरज बाजीराव बल्लाळ प्रधान चरणावरी मस्तक ठेवून सा० नमस्कार विनंति येथील वर्तमान ता० छ० २४ जिल्हेज मुक्काम नस- राबाद प्रांत खानदेश स्वामींचे आशीर्वादेंकरून वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामींनीं कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन बहुत संतोष जाहला. ऐसेंच हरघडी पत्र पाठवून सांभाळ करावा. स्वामी समर्थ आहेत. यानंतर तोहमास्तकुलीखान उत्तरेकडून आले, त्याची व महमदशहा पादशहाच्या फौजेची लढाई होऊन दिल्लीची पादशाही बु- डाली. पातशहास व निजामउल्मुलुक यास व कमरुद्दीनखान यास कैद केलें. खानदवरा युद्धामध्यें लेकभावासहवर्तमान मृत्यु पावले. सादतखान यांसी त्यांणीं घरून नेर्ले. त्यावर त्याणें तीन क्रोडी द्रव्य द्यावें ( ऐसें ) करून त्याचा चाकर जाहला. त्याणें पांच सात हजार फौज समाग में देऊन दिल्लीची बंदोबस्ती करावयाबद्दल पुढे पाठविली. मागाहून आपण दिल्लीस येणार होते. आलेच असतील. दिल्लीस दाखल जाहले. याउ परी दक्षिण प्रांतें स्वार होणार आहेत. याजउपरी त्यास आणखी कोणी गनीम आहे असें नाहीं. आझी त्यास व ते आझांस गनीम आहों, अशास जो ते तेथून निघाले नाहींत तो तमाम मराठ्या फौजा एक होऊन चमेली पार व्हावें, त्यास अलीकडे येऊं न द्यावें, असा विचार आहे. सर्व चित्ता स्वामींस आहे. अरिष्ट तें मोटेंच आलें. वस ● १ छ० २४ जिल्हेज: ता० २४ मार्च इ. स. १७३९ शनिवार २ बाजीरावांचा विचार सर्व हिंदु फौजा एकत्र करून, चमेल पार होऊन दिल्लीस जावें असा होता व त्याप्रमाणे त्यांनी रजपूत व बुंदेले राजांसी गुप्त रीतीने सलोख्याचे तह करून यलही केला होता. परंतु तो अंमलांत आणण्यापूर्वीच ना. दिरशहानें महमदशहा बादशहास गादीवर बसविले आणि तो आपला बंधु आहे, त्याच्या आज्ञेत सर्वांनीं चालावे ह्मणून हिंदुस्थानांतील प्रमुख राजेरजवाड्यांस