पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६३ ल्याचें वर्तमान पहिलें सेवेसी लिहिले आहे, त्यावरून विदित जाहलेंच असेल, माहिम घेतल्यावरी दुसरे दिवस छ १० सवाली केळवें हल्ला करून घेतलें. ऐसीं माणसांचीं डोचकीं मारिलीं. त्याच सलाबतीनें शिरगांवकरांनी कौल घेतला. केळंवे जागा थोर नव्हती. माफ (क) च होती. शिरगांवची माडी होती ते आली. अतःपर चिरंजीव तारापुरास बसले असतील, त्यास स्वामींचे आशीर्वादें तेही जागा हस्तगत होईल. सारांश स्वामींचे कृपेकरून होणें तें बरेंच होईल. "वसईची आपण आ शीर्वाद दिल्हा आहे त्याप्रमाणे होईलच. यांत संदेह नाहीं. आझी लेंकरें स्वामींचीं आहों. सर्वस्वी श्रुत होय हे विज्ञापना." [ लेखांक ४० ] श्री. श्रीमत् महाराज परमहंस श्री स्वामींचे सेवेसी.- चरणरज बाजीराऊ बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल तागाईत छ० ७ जिल्काद जाणोन निरंतर आशीर्वादपत्र सांभाळ - १ छ० १० सवाल:- ता० १० जानेवारी इ० स० १७३९, बुधवार. २ केळवें:- हे माहिमाजवळ एक लहान गांव आहे, ह्मणून केळवें माहिम ह्या संयुक्त नांवानें तें प्रसिद्ध आहे. येथेंही एक लहानसा किल्ला आहे. ३ तारापूर:- हें गांव ठाणे जिल्ह्यांत आहे. हे पोर्तुगीज लोकांच्या ताब्यांत होतें. ते चिमाजी आपांनी ३० स० १७३९ मध्ये जिंकून घेतले. नंतर मराठ्यांनी ये- थील किलयाची चांगली दागदुजी केली व तेथें चार तोफा ठेवून किल्लयाच्या नीट बंदोबस्त केला. ४ वसईचा आशीर्वादः- स्वामींनीं चिमाजी आपांस "वसई दिली" ह्मणून अ गोदरच आशीर्वाद दिला होता. त्या आशीर्वादाप्रमाणे वसई फत्ते करण्याचा चि माजी आपांनीं यत्न केला. ५ छ० ७ जिल्कादः - ता० ६ फेब्रुवारी इ० स० १७३९, मंगळवार -