पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ पाठवावें. त्याचें वर्तमान मनास आणून त्यास उत्तर सांगणें तें सांगून. सालगुदस्ता व्यंकटराव इत्यादिक सरदार त्या प्रांतें जाऊन श्रम साहास केलें, जुंजले, भांडले, तुटले, फाटले, मुलूख साधिला, त्यास तेथून उडवून द्यावें ही गोष्ट स्वामींच्या तरी चित्तास येते की काय ? श्रम साहास करून मुलूख साधणार सर्व सरदार आहेत. आझीं अशी गोष्ट केलीयास कोण्ही बांधतो असें नाहीं. असो. स्वामी ईश्वरस्वरूप आहेत. स्वामींनीं त्या गृहस्थास येथें पाठवून द्यावें. त्याचें वर्तमान श्रवण होऊन उत्तर त्यास सांगणें तें सांगून व त्याचे हातून सोंधे प्रांतीचें (राज) कारण अथवा विदनूर प्रांतीचें अगर गोंवें प्रांतीचें राजकारण होईसीं असतील तीं लक्षप्रकारें त्याचे हातून घेऊन. मुख्य गोष्ट फिरंगी याचा आमचा सलूख नाहीं. फिरंगी आमच्या जाग्याचे गळां येऊन पडणार. तसेंच सोंधेकराचा आमचा सलोख नाहीं. तो उपद्याप करणार. आझी त्याचा मुलूख पालथा घालणार. ऐसा प्रसंग आहे. तेथें कमावीस कोठून चाल- णार व गोंत्र्याचे साहुकार फेडण्यास[?] कोठून येतील ? आमच्या फौजा त्या प्रांत जाणें त्या जाऊन गर्गशा करतील. ऐसा विचार आहे. स्वामींनीं सात शेणव्यास पाठवून द्यावें. त्याचे हातून राजकारण प्रसंगानें जे जे घडोन येतील ते त्याचे हातून करविले जातील. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक ३९] श्री. श्रीमत् महाराज परमहंस श्री स्वामींचे सेवेसीः— - चरणरज बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल श्रीकृपें यथास्थित असे विशेष चिरंजीव राजश्री आपांनी माहिमे घेत- १ माहिम:- हे गांव ठाणे जिल्ह्यांत आहे. येथे एक लहानसा किल्ला आहे. येथें पोर्तुगीज लोकांचे ६० शिपाई व १५ जेजाला असत. चिमाजी आपा पेश- व्यांनी हें इ० स० १७३९ च्या जानेवारीमध्ये हस्तगत केलें.