पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करावयास आज्ञा करावी. यानंतर तारापूर संस्थान घेतल्याचें वर्तमान पूर्वी सेवेसी लिहिले आहे. त्यावरून विदित जाइलेंच असेल. तारापूर घेतल्यावरी अशीरंगड किल्ला फिरंगी याचा हस्तगत जाहला. किल्ला मातबर बिलंद आहे. परंतु स्वामींचे आशीर्वादें हस्तगत जाहला. अतःपर चिरंजीव राजश्री आपा कुल फौजेनिशीं साष्टीस गेले. साष्टींत तीन स्थळें त्यांपैकीं वेसावीयास खंडोजी माणकर यांणीं मोर्चे देऊन जेर केले आहे. स्वामींच्या आशीर्वादें इतक्या दिवसांमागे जाहलेंच असेल. वसई घेतल्यावरी वानरें, धारावी हीं दोन स्थळे आपा गेल्यावरी घेतील. एकूण साष्टींतील तिन्ही स्थळें हस्तगत जाहल्यावर वसईचाही यत्न करतील. मुख्य स्वामींचा आशीर्वाद मस्तकीं आहे तेणेंकरून सर्व गोष्टी उत्तमच होतील. रजया आज्ञेप्रमाणें दोन सुसीच्या पाठविल्या आहेत. सेवेसी प्रविष्ट होतील. लोभ असों दिजे. सेवेशी श्रुत होय हे वि ज्ञापना. [ लेखांक ४१ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल - - १ तारापूर संस्थान:- हे छ० २४ सवाल रोजीं फत्ते झाले. ह्याच दिवशीं पेश- व्यांचा प्रख्यात सरदार बाजी भिवराव हा रणामध्ये मृत्यु पावला. २ अशीरगड:- हा किला छ० २ जिल्काद (ता० १ फेब्रुवारी १७३९) रोजीं फत्ते झाला. हा ठाणे जिल्ह्यांत आहे. ह्यास अशेरी अर्सेही ह्मणतात. हा किल्ला पो र्तुगीज लोकांकडे पुष्कळ वर्षांपासून असून ते त्याची फार योग्यता मानीत असत व त्यांची बायकामुले त्याचे संरक्षण करीत असत. ३ वेसावें:- हे ठिकाण खंडोजी माणकर यांणीं छ० ७ जिल्काद रोजी सर केलें. हे लहानसे बंदर साष्टीच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. ४ वानरें धारावी: – वानरें (ज्यास वांद्रे Bandra ह्मणतात तें) व धारावी हीं दोन गांवें मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यांत आहेत.