पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काज काम करून घ्यावें. हामी मातबर त्रिंबक शेट गुजर देतो अथवा सोंधेकराचा मुलूख सोंधेकराचे हवालीं करून सोंधेकराकडून पैका घ्यावा ऐसाच सिद्धांत झाला तर कोणते रोतीनें करणें तें लिहिले पाहिजे. त्या सारिखा तोही मजकूर मनास आणूं" ह्मणोन विस्तारें लिहिलें तें कळलें. ऐसियास स्वामींनीं आज्ञा केली ते यथार्थच आहे. स्वामींपार्शी गृहस्थ तिकडील माहित[गार] मामला करणार त्यास येथें पाठवून द्यावें. त्याचे मुखें तिकडील सर्वही वर्तमान मनास आणून राजप्रकरणप्रसंग कसे काय सांगतो तेही कळतील. तदोत्तर त्यास उत्तर सांगणें तें सांगून. यो- जिला आहे गृहस्थ यास टाकून दुसन्यास हुद्दा सांगाल तर जो करील त्यास श्रापूं व मुलूख तुमच्या हातचा जाईल ह्मणोन आज्ञा, तर मुलूख मामला साधला तो स्वामींच्या आशीर्वादप्रतापें साधला. गेला तर स्वामींचा गेला. यांत आमचें काय गेलें ! आझी आज्ञाधारक स्वामींचे. स्वामी पूर्ण अभिमानी आहेत. तेथें आह्नीं चिंता करावीसें काय आहे ? परंतु नूतन ठेवून स्वामींजवळ विनीतभावें विनंती करितात तेंच स्वा- मींस प्रमाण वाटेल. त्यासच हुद्दा सांगा. नाहींतरी जो करील त्यास श्रापीन हाणोन आज्ञा होते. आह्नीं वडील वडिलोपार्जित स्वामींचे च- रण अर्चिले असतां आमचें भाषण स्वामींस अप्रमाण वाटतें हीच गोष्ट अपूर्व आहे. असो. स्वामींजवळ जो गृहस्थ आला आहे त्यास येथें असत. येथील शिवाप्पा नाईक फार प्रसिद्ध असे. बाजीरावांनी ज्या वेळी श्रीरंग- पट्टणावर स्वारी केली त्या वेळीं येथें सोमशेखर नाईक ह्मणून राजा होता (३० स० १७१४-३० स० १७३९). तो मेल्यानंतर त्याचे मागून बसाप्पा गादीवर बसला. तो मेल्यानंतर त्याची राणी राज्य करीत असतां हैदरानें बेदनुरावर स्वारी करून तो सर केला. राणी विरम्माजी ही राजवाड्यास आग लावून पळून गेली. नंतर हैदरानें तेथें लुटालूट करून अतिशय द्रव्य नेलें. पुढें तेथें त्यानें हैदरनगर ह्या नांवाचें गांव वसविलें सांप्रत मैसूर इलाख्यांत हे गांव असून ते नगर ह्या नांवानेंच प्रसिद्ध आहे. आतां बेदनूरचा मागमूसही राहिला नाहीं. ●