पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्रह्मचारी व गणेशभक्त विष्णुवावा हे राजुरीहून निघून सात आठमहि न्यांनीं परमपवित्र काशी क्षेत्रीं गेले. तेथील विविध यात्रा व देवदर्शनें करून ते कांहीं दिवस पुण्यसरिता भागीरथी हिच्या तीरीं राहिले. तेथे त्यांस अनेक महासिद्ध सत्पुरुष व योगीजन ह्यांचा दर्शनलाभ झाला, आणि त्यांच्या सान्नि- ध्यानें त्यांस परमार्थविषयक व वेदांतपर उपदेशामृत यथेच्छ प्राशन करावयास सांपडलें. त्यामुळे त्यांच्या मनावर विलक्षण संस्कार होऊन चतुर्थाश्रम संपादन करावा आणि सद्गुरुचरणीं लीन व्हावें अशी इच्छा झाली. काशीमध्यें ज्ञानेंद्र सरस्वतिनायक एक महाविद्वान् व वेदांतज्ञानपरिपूर्ण असे तपोनिधि अखिल यतिवृंदामध्यें श्रेष्ठ गणले जात असत. त्यांच्या ठिकाणीं विष्णुवावांची अत्यंत भक्ति जडली. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर अनुग्रह करून त्यास परमहंस दीक्षा दिली आणि त्यास ब्रह्मेद्रस्वामी असें नामाभिधान दिलें. चतुर्थाश्रम संपादन केल्यानंतर ब्रह्मेद्रस्वामींनीं कांहीं दिवस सद्रुसमागम करून त्यांपासून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतले. सद्गुरुवांचून ब्रह्मज्ञानाची खरी ओळख होत नाहीं. यास्तव अनेक साधुसंतांनीं सद्गुरुकृपेचा महिमा फार वर्णन केला आहे. श्री समर्थ रामदासस्त्रामी ह्यांनीं दासबोधामध्यें ह्मटलें आहेः- "सद्गुरुविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाहीं । अज्ञान प्राणी प्रवाहीं । वाहतचि गेले ॥ १ ॥ जैसें नेत्रीं घालितां अंजन। पडे दृष्टीस निधान । तैसें सद्गुरुवचें ज्ञान । प्रकाश होय ॥ २ ॥ सद्गुरुविण जन्म निर्फळ । सद्गुरुविण दुःख सकळ । सद्गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥ ३ ॥ असो, जयास मोक्ष व्हावा । तेणें सद्गुरु करावा । सद्गुरुविणें मोक्ष पावावा । हें कल्पांतीं न घडे ॥ ४ ॥ तुकाराम महाराजांनीं ह्मटलें आहेः- - - "C 'सद्गुरुवांचोनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधीं त्याचे ॥” ह्याप्रमाणे ब्रह्मेद्रस्वामी यांनीं श्री ज्ञानेंद्रस्वामी नामक महासद्गुरूंची उपासना घेऊन ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतले. अर्थात् लोहास परिसस्पर्श झाला ह्मणजे त्याचें सुवर्ण होतें किंवा गंगेस दुसरी नदी मिळाली ह्मणजे ती गंगारूप बनते