पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० ऐसा भारी माणोस पाठविलिया उत्तम आहे. केवळ राजश्री व्यंकटराव यांचे हवालीं केलियास कृष्णरायासारिखे होईल. दुसरे फिरंगी यांची जबरदस्ती जाहल्यासी तुमची कुमक पोहोंचून स्थळे जतन होत तरी बरें, नाहींतर सोंधेकराचीं ठाणीं सोंधेकराचे स्वाधीन करून खर्च जा हला पैका घ्यावा. ह्या दोहों पदार्थातील तुमचे विचारें कोणती गोष्ट करावी तें लिहिणें, जरीकरितां तेथें ठाणेंच होणें असेल तर त्या प्रांतींची माहिती आणि मातबर सावकार जामीन येथें देई व रसदही देई असा आह्मी येथें एक ( गृहस्थ ) योजिला आहे. त्याचे स्वाधीन तेथील क मावीस करावी. ठाणियाचा बंदोबस्त आहे त्याप्रमाणे असों द्यावा. यो जिला आहे गृहस्थ याचे स्वाधीन पंचमहालची कमावीस केलियासी कित्येक कामकाज फिरंगी याजकडील वगैरे त्याचे हातून घ्यावें. जरी आमच्या लिहिण्याची अक्शा करून पंचमहालचा हुद्दा दुसऱ्याचे स्वा- धीन कराल तर त्यास श्रापून त्याचेंही बरें न होय, आणि तो मुलूख तुमच्या हातून जाईल असें समजणें; यास्तव योजिले गृहस्थासच धंदा सांगणें ; झणजे त्याचे हातून सोंधे, बुदनूर ( वेदनूर १ ) व गोंवें वगैरे १ व्यंकटरावः - व्यंकटराव नारायण धोरपडे ? २ सालगुदस्ता व्यंकटराव इत्यादिक सरदार त्या प्रांत गेले ह्मणून ह्या पत्रांत उल्लेख आहे त्यावरून हे पत्र इ० स० १७३८०३९ सालचे असावें. कोकणप्रांतीं फिरंगी लोकांकडे साष्टी प्रांत होता तो घेण्याची मसलत ठरवून चिमाजी आपा छ० १ जिल्हेज ह्मणजे वैशाखमासीं निघून कोकणांत गेले. त्या समयीं गोव्यां- कडे शह देण्याकरितां व्यंकटराव नारायण ह्यांस फौज देऊन पाठविले होते. तेथें त्यांनी चांगला पराक्रम करून मुलूख सर केला व तेथें आपलें ठाणे बसविलें. त्यास अनुलक्षून हा उल्लेख असावा. २ वेदनूर:- हें पूर्वी जंगल होतें. येथे १६४० मध्यें बेदनूर नामक गांव बस बिर्ले जाऊन इकेरी येथील केलाडी राजांनी आपली राजधानी केली. ह्याची पुढे फार भरभराट होऊन येथे मोठें नगर वसलें गेलें. येथील राजास नाईक ह्मणत