पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डीत असत. असा प्रकार इ० स० १७६३ पर्यंत चालला होता. इ० स० १७६३ मध्यें हैदरानें बेदनूर घेऊन हैबतजंग नामक आपल्या सरदारास सोंध्यावर पाठविलें. त्या वेळी तेथील राजा सवाई इमोदी सदाशिव हा कारवारच्या उत्तरेस ८ मैलांवर शिवेश्वर येथें पळून गेला, आणि पोर्तुगीज लोकांच्या आश्रयास जाऊन राहिला. त्या वेळीं पोर्तुगीज गव्हरनर Mannel de Seldanha de Alboquerque हा होता. त्यानें हैदराचा प्रतिकार करण्याचा थोडा प्रयत्न केला परंतु त्याचा कांही उपयोग झाला नाहीं. शेवटीं तो गोंवें प्रांतांत गेला. तेथें त्यास ५२५ पौंड पेनशन देऊन पोर्तुगीज लोकांनी आपल्या संरक्षणाखाली ठेविलें (ता० १० एप्रिल इ० स० १७६८). पुढे त्यानें त्यांच्या विरुद्ध इ० स० १७७४ मध्ये कांहीं गड- बड केल्यावरून त्यास गोंव्यानजीक मौळे (Moula) येथें ठेविलें, व त्याचें पे- नशन ३५० पौड केलें. तथापि त्याची मानमरातब चांगली ठेविली होती. तो मेल्यानंतर ३० स० १७८२ मध्ये सवाई बासवलिंग हा त्याच्या मिळकतीचा मा लक झाला. हा इ० स० १८३४ मध्ये वारला. नंतर त्याच्या मागून सदाशिव व वीरराजेंद्र असे दोन पुरुष झाले. परंतु ते अल्पायुषी झाल्यामुळे त्यांच्या संपत्तीस त्यांच्या बायका मालक झाल्या. त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता. त्याचा वं शज अद्यापि गोमांतकांत आहे. मराठी इतिहासवाचकास सोंधेकराची ओळख होण्याकरितां ही विस्तृत मा हिती दिली आहे. हैदरानें सोंधे घेतल्यानंतर त्याची धूळधाण झाली. पुढे टिपूच्या कारकीर्दीतही तेथे लुटालुटीचा प्रकार चालला होता. टिपूची समाप्ति झाल्यानंतर इंग्रज, पेशवे व निजाम ह्यांच्यामध्ये मुलुखाची जी वांटणी झाली त्यांत सोंधे पे- शव्यांकडे येत होतें, परंतु तें त्यांनी घेतलें नाहीं. तेव्हां त्यावर इंग्रजी अंमल का यम झाला. सोंधे येथें सांप्रत स्मार्त, वैष्णव, आणि जैन लोकांचे मठ आहेत, व एक जुना किला असून तो प्राचीन वैभवाची साक्ष देत आहे. बाकी येथें पूर्वीचें वैभव कांहीं राहिले नाहीं. नाहीं ह्मणावयास एक १८ फूट लांबीची तोफ असून ती तेथील रणसंग्रामाची साक्ष देत आहे! सोंधे (Sonda) हे गांव सांप्रत कारवार जिल्ह्यांत मोडत आहे. हें सिर्सी गांवाच्या उत्तरेस ८ मैलांवर आहे. ८