पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ [लेखांक ३८ * ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- विज्ञापना गोंवें प्रांताहून सात शेणवी आला आहे, त्यांणीं स्वामींचे सेवेसी विनंती केली त्याचा विस्तार स्वामींनीं लिहिला, त्यांत मुख्यार्थ हाच कीं, “फोंडें' पंचमहाल जागा बाका, त्या जाग्यास आपलें ठाणें मातबर बसल्यास फिरंगी यांसीही शह देऊन साष्टी बारदेशचा पैका घेई व सोधेकरासही भारी होऊन त्या प्रांतीं ठाण घेऊन स्थळे जतन करी १ -

  • ह्या पत्रावर बाजीराव पेशव्यांचें नांव नाहीं तथापि पत्राच्या भाषेवरून तें

बाजीराव यांचेंच असावें. १ सात शेणवी:- हें नांव असावें. सातवा वगैरे नांवें आहेत. - २ फोंडें:- हा गोंवें प्रांतांत एक महाल आहे. येथील ठाण्यासंबंधाने ह्या पत्रांत मजकूर आहे. - ३ साष्टी बारदेश: - पोर्तुगीज लोकांच्या ताब्यामध्ये हा प्रांत आहे. ठाणे जि ल्ह्यांत साष्टी ह्मणून गांव आहे त्याप्रमाणे गोमांतकामध्ये साष्टी अर्से गांव आहे. ४ सोधे:- हें कर्नाटकांतील एक जुनें संस्थान होतें. येथील राजास सोंधेकर असें ह्मणत असत. शिवाजीच्या कारकीदींपासून मराठे ह्या संस्थानाकडून खंडणी घेत असत. ३० स० १७६३ पर्यंत कर्नाटक प्रांतामध्ये उत्तरेस सोंधेकर व दक्षि णेस वेदनूरकर हे दोन संस्थानिक प्रबल होते. इ० स० १७६३ सोंधे व वेदनूर हे दोन्ही प्रांत हैदरानें हस्तगत केले. बासवलिंगाप्पा ह्मणून जो सोंध्याचा राजा होता त्याच्या कारकीर्दीत ( इ० स० १६९७-३० स० १७४५) बाजीरावांनी सोंध्यावर इ० स० १७२६ मध्यें स्वारी केली होती. त्या वेळी त्यानें व वेदनूरच्या राजानें चौथाई खंडणी देण्याचे कबूल केले व त्याप्रमाणे खंडणी येत होती. परंतु इ० स० १७३५ मध्ये दिसेंबरच्या ४ थ्या तारखेस पोर्तुगीज लोकांचा व त्याचा तह झाल्यामुळे तो मराठ्यांशीं सलोख्यानें वागेनासा झाला, एवढेच नव्हे तर तो पोर्तुगीज लोकांस साह्य देऊं लागला. ह्यामुळे त्यावर मराठ्यांचा रोख होता. पुढे सोधेकराचा मराठ्यांनीं पराभव केला व त्यानें पुन: खंडणी कबूल केली. परंतु मधून मधून पुनः तो मराठ्यांच्या विरुद्ध होत असे, व त्याची खोड मराठे मो-