पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करार असतां न आणिले ह्मणून शब्द लावून लिहिलें; ऐसियास माये- खेरीज शब्द लाविजेल ऐसा अर्थ नाहीं. स्वामींची कृपा आहे ह्मणूनच इतकें लिहिलें, वरकड स्वामी अंतरसाक्ष आहेत. खंडूस विलंब लागायास कारण व नगारे न यावयाचा प्रसंग सर्व अंतरांत आलाच असेल. येथें वोढीचा प्रसंग बहुत जाइला होता. याजमुळेच खंड्स विलंब लागला होता. तसेंच नगारे आणावयाचा प्रसंग तरी येते समयीं सोनगडाकडून येणें जाहलें असतें तरी समागमेंच आणावयाचा योग घडला असता. परंतु तिकडून येणें न जाहलें. स्वामींचे नगारे राहतील ऐसा अर्थ नाहीं. येतील. संकट नाहीं. विकल्पवासनेचा विचार लिहिला तरी स्वामींचे चरणरज असतां संकल्पविकल्प कोठें असणार ? मन बुद्धि वासना सर्व स्वामींचेच पाय आहेत व स्वामींचाच आशीर्वाद तोच आमचा खजाना फौज आहे. पैक्यासाठीं कांहीं चित्तांत आलें असेल तर सांप्रत वोढीच्या प्रसंगास्तव व वसईकडील खर्चानिमित्य आणखी स्वामींजवळ ऐवज असेल तो द्यावा लागतो. वसईकडील सलुखाचा मजकूर लिहिला त्यास सलूख करावयास आह्मी राजीच आहों. परंतु विचार करून करावा लागतो. चिरंजीव राजश्री आपा कोकैणांत जाणार आहेत. फिरंगी वि- चारावरी आल्यावरी सलुखाचा विचार होईल. तरी करावयास अंतर पडणार नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति. १. वसईकडील खर्च: -वसई घेण्याचा यत्न पुष्कळ दिवसांपासून चालू अ सावा असे यावरून दिसतें. २ आपा कोकणांत जाणार आहेत ह्मणून उल्लेख केला आहे त्याप्रमाणे ते छ० २८ रमजान रोजी कोकण प्रांतीं माहिमास गेल्याचा दाखला सांपडतो.