पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जवळ नबाबांवरील सलाबत बरीसी चढली. नवाब भुपाळच्या आश्र- यास तीस चाळीस हजार फौजेनिशीं बसले. आमचे मोर्चे हातघोंडि यावरी बसले आहेत. करोलांचा मार देत आहे. मोंगलांचा अर्गानग केला आहे. दाणा, गल्ला, वैरण, काडी कुल बंद झाली आहे. बंगंसा- - १ बंगसाची गतः - बाजीरावांनी छत्रसाल राजाच्या मुक्ततेकरितां महमद- खान बंगषाबरोबर जेतपूर येथें जी लढाई केली तींत बंगपाची अशीच स्थिति झाली होती. ह्या संबंधाचा उल्लेख बाजीरावांच्या मागील पत्रांतही आहे. ह्याकरितां ह्या संबंधाची थोडी विस्तृत माहिती देणें अवश्य आहे. महमद- खान बंगष हा बंगष जातीचा एक रोहिला सरदार होता. तो फिरुखसियर बाद शहाच्या कारकीर्दीत उदयास चढला, ह्मणून त्यानें त्याच बादशहाच्या नांवानें फरुकाबाद है शहर वसविलें. ह्यास महमदशहा बादशहाच्या कारकीर्दीत मा- ळव्याची व अलहाबादेची सुभेदारी मिळाली होती. हा तेथील सुभेदार असतांना ह्यानें छत्रसाल राजावर स्वारी केली व त्यास मनस्वी त्रास दिला ह्मणून त्या वयो- वृद्ध हिंदु राजानें बाजीराव पेशव्यांस विनंतीपत्र पाठवून आपल्या मदतीस बोलाविलें. त्याप्रमाणे बाजीराव पेशव्यांनी बुंदेलखंडावर इ० स० १७२९ मध्ये स्वारी केली व महमदखान बंगपाच्या फौजेशीं मातबर लढाई दिली. त्या लढाईत महमदखानाचा पराभव होऊन तो जेतपूरच्या किल्यामध्ये पळून गेला. परंतु मराठ्यांनी त्या कि- ल्यासभोंवतीं वेढा बसवून त्याची सर्व सामग्री बंद केली, त्यामुळे त्याच्या सैन्याचे फार हाल झाले. त्याचे वर्णन फरुकाबादच्या नवाबांच्या इतिहासामध्ये केले आहे ते येणेप्रमाणे :- -

  • * Jaitpur was strictly invested for several months till

there was no longer any grain for food. Then the soldiers began to slaughter their horses and bullocks. Flour could not be procured even at one hundred rupees a seer.......Many of the soldiers died of starvation, and many more leaving the Nawab to his fate escaped from the fort. Bajirao's orders to his guards were that any of Mahomed Khan's men who gave