पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ ते हल्ली पदरचे देतील हे गोष्टी तशासारखी. दिल्लीस गेल्यावर सार्व- भौमापासून प्राप्त जाहल्यास चुकणार नाहीं. करार झाला यांत अंतर न करावें ऐसी मनरोटी नवावांनी दिली. अतःपर नवाब खता करतील १ कदाचित् काळकम [काळक्रमें?] दुर्बुद्धि निर्माण झाली तर केलें पावतील. श्री त्यास जय देणार नाहीं. लोभ असों दीजे हे आशीर्वाद. [ लेखांक ३६] श्री. श्रीमंत परमहंस महाराज श्री स्वामींचे सेवेसीः- चरणरज बाजीराव वल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल महाराजांचे आशीर्वादें पौष वैद्य १४ पावेतों मुक्काम भुपाळ येथें यथा- स्थित असे विशेष. फौजसहित या प्रांती आलों. नवाबाचा व आमचा मुकाबला व्हावा तो नबाब भुपाळच्या आश्रयास गेले. छ० ३ रमजानीं एक युद्ध जाहलें. दुसरें कालही एक युद्ध नबाबाचें व लोकांचें जाहलें. बराच तमाशा नवाबांनी पाहिला. महाराजांचे प्रतापें मोर्चे- ● - गुप्त रीतीनें सांगून पाठविले. त्याप्रमाणे मुबारिझखानाने तयारी केली. त्याप्र संगी निजामानें पेशव्यांची मदत मागितली. त्या वेळी पेशव्यांनी उत्कृष्ट मदत क रून साखरखेडलें येथे छ० २३ मोहरम (ता. १ आक्टोबर सन १७२४) रोजीं मुबारिझखानाचा पराभव केला व त्यास व त्याच्या दोन पुत्रांस यमसदनीं पा ठविलें. ह्यामुळे निजामाची दक्षिणची सुभेदारी निर्वेध झाली. इतकें उत्कृष्ट साह्य ह्या वेळीं पेशव्यांनी केले परंतु निजामानें त्याचा योग्य मोबदला दिला नाहीं. ह्या प्रसंगाचें स्मरण ठेवून पेशव्यांनी निजामाच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. १ पौष वार १४:- ता० ८ जानेवारी इ. स. १७३८ रोज रविवार. २ छ० ३ रमजानः ता० १५ दिसेंबर इ. स. १७३७ रोज गुरुवार ३ काल: - ता० ७ जानेवारी इ. स. १७३८, शनिवार ४ तमाशा:- पराक्रम. जुन्या पत्रांतून हा शब्द फार वेळां येतो. शिवाजीनें आपला सापल बंधु तंजावरचा व्यंकोजी ह्यास जे उपदेशपर पत्र लिहिले आहे त्यां तही “तमाशा दाखविणे" ह्मणजे पराक्रम दाखविणे असाच उपयोग केला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये तमाशा हा शब्द ह्याच अर्थी आहे.