पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३ बस्तीनें चालत उठावें तर घोडे माणूस बहुत खर्च होऊं लागलें, घा वयाविणें तग करून बुडवावें तर मोंगल लोक मागें सर खाणार ? जुंनतां दिसगत लागल्यास चार दिवस निघोन जातील. हा अर्थ व तुझीं कि- तीएक विचार लिहिला तो चित्तांत आणून सौरस्याचा प्रसंग संपादिला. जो नबाब चौथाई व सरदेशमुखीचीं नांवें घेत नव्हता त्यांणीं माळवे दरोबस्त ऐसें खासदस्तकानें लिहून व लिहितां उच्चार केला की, " या मागें कधींच गोष्टी न जाहली ते या प्रसंगीं जाहली" व नवाबांनी हे गोष्टी मान्य करणें दुरापस्त पुत्राचे नांवें सुभेदारी करून समागमें आणिलें त्या माळव्याची दरोबस्त सनद करून देतो. नवाबाच्या चि त्तांत कल्पांत आला. परंतु काय करील ? संकटाचा प्रसंग देखोन द्यावें लागलें. जे राजेराजवाडीयाचे आपले बरे इच्छू कश्यप धरून होता ते त्यास हातचे सोडावे लागले. हे दुःख लहान सामान्य न जाहलें. आपा, राजश्री स्वामींचें तपोबळ, वडिलांचें पुण्य समर्थ तरीच ही गोष्टी घडोन [आली]. अन्यथा होणें कळलेंच आहे. आज पादशाहींत नबाबासारिखा अमीर दुसरा कोण आहे? याणें जो पाया घालून दिल्हा तो अवध्यांत श्रेष्ठ आहे. नबाब अतःपर दिल्लीस जातील व समागमें कोणी द्यावयाचा तो देऊन नवाब दिल्लीस गेलियावरी या प्रांताचा व राजवाडीयांचा बंदोबस्त कर्तव्य तैसा करून होईल वर्तमान तें लिहून पाठवू. कांहीं द्रव्य नवाबाजवळ मागावें ही इच्छा होती, परंतु नबाब द्रव्याचा लोभी, पूर्वी याची साहित्य केली ते समयीं मन वाढवून द्रव्य देववलें नाहीं, व ● १ पूर्वी:- ह्मणजे इ० स० १७२४ सालीं नवाबास बाजीरावांनीं साह्य केलें होतें. तो प्रसंग असा की, निजाम दिल्लीदरबारांतून निरोप घेऊन दक्षिणेत आ ल्यानंतर त्याच्या स्वार्थप्रचुर आणि कपटी वर्तनामुळे बादशाहाच्या मनांत राग येऊन त्यानें हैदराबादचा सुभेदार मुबारिझखान ( मराठी कागदपत्रांत कंबरज- खान असे नांव दिले आहे) ह्यास सैन्य जमवून निजामाचें पारिपत्य करण्याबद्दल