पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ ठराव केला कीं माळवा दरोबस्त द्यावा. पादशाही सनद दिल्लीस गे- ल्यावर करून द्यावी. द्रव्याची बोली पहिली राजश्री धोंडो गोविंद यांचे विद्यमानची आहे, त्याची रजबदल करून जे साधेल तें करून द्यावें. नर्मदे व चमेलमध्ये राजे आहेत त्यांजपासून आह्मी पैके घेतों तैसा क मपेस घेणें तो घ्यावा. राजे यांस निरोप देऊन नबाबांनीं दिल्लीस जावें. कोणेविसीं तफावत न करावी. जे गोष्टीनें आमचें बरें होईल तें करावें, या गोष्टीनें मजकुरात द्यावे तेसी सिबत जाला. काल छ २६ रमजानीं सदहुप्रमाणे करार करून नवाबांनीं माळवा दरोबस्त जाहगीर सुभे- दारीचे यादीवरी दस्कत करून दिलें व द्रव्यही साधेल ते पादशा- हापासून करून देऊं ऐसें खासदस्तकानिसीं लिहोन दिलें. राजश्री पि लाजी जाधवराव व राजश्री बाबूराव मल्हार नबाबाचे दर्शनास पाठवून दस्तकखतानिसीं याद करून दिली. यावर तमाम लष्करास व वाणी- यांस ताकीद करून इरसाल पोहोंचवून दिल्हा. अतःपर नवाब आपले बुरंगे बाहेर दक्षिणेस रवाना करून दिल्लीस जातील. सारांश नवाबास अडचणीचा प्रसंग प्राप्त झाला ह्मणवून आपण हावभरी होऊन बुडवा- याच्या सायासास लागावें तर नवाबाची फौज तोफखाना व बंदोबस्त पाहतां अवघाच ध्यानांत आला. रोहिले, बुंधेले व रजवाडे व सवाईची फौज व खेची व नरंवर आदिकरून खासा नबाब देखील तीस पस तीस हजार, या खेरीज तोफखाना, तोही कोणे प्रकारचा है तुझी जाणतच आहां. सभोवता आराबा चालून तमाम फौजेनिशीं तोफखान्याचे पाठीं चालावें तर राऊत अगर पायींचे माणूस निघावया गरज नाहीं. बंदो- १ सवाई:- सवाई जयसिंग. २ खेची व नरवर हीं ग्वाल्हेर प्रांतांतील जुनीं संस्थानें होत. सांप्रत राघो- गढ ह्मणून जे मध्य हिंदुस्थानांत संस्थान आहे तें खची ह्या नांवानें प्रसिद्ध आहे. येथें खेची जातीचे रजपूत लोक आहेत झणून ह्या प्रांतास खेचीवाडा असे ह्मणतात.