पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

903 बगैरें ● जान जाणून आपणाकडील कुशळ लिहित जाणें, यानंतर तुमची पत्रे छ ८ रमजानचीं वरणगांवचे मुकामचीं विश्रामाबरोबरी आलीं व दुसरी पत्रे छ० ११ रमजानचीं आलीं तीं छ० २४ रमजान पावली. लेखनार्थ विस्तारें कळला. येथील वर्तमान काल लिहून पत्र पाठविलें आहे त्यावरून कळलेच असेल. अलीकडील वर्तमान तर नवाब बुनगे कांहीं भुपाळांत व कांहीं इस्लामपुरांत टाकून सलुखाची संदर्प लावून कोस दोन कोस चालतात. आमच्या फौजा चौतर्फा चालवून दाणा- गल्ला घांसलकडी बंद केली. एक रुपयास एक शेर अन्न जाहलें, तेंही कोणास प्राप्त कोणास अप्राप्त जालें. घोडीं पळसाचा पाला खाऊं ला- गलीं. परवा छ २५ रमजानीं मोंगल पठाणांनीं भाड्याचे बैल खादले. रजपुतांस तो केवळ उपास पडों लागले. ऐसा प्रसंग जाहला. तेव्हां नबाब सर्वोचें दुःख पाहून बहुतच काहिला होऊन सलोखाविसीं त्वरा केली. बोलीच्या प्रसंगास पहिलेच आबदुल खेरखान व सयद लष्कर- खान व अनवर अल्लाखान होते. सांप्रत आयामल यांहीं सांगोन पाठविलें की बोलीचालीच्या प्रसंगांत आपणास बोलाविल्यास आमची अब्रू आहे. व आह्मी तुमचे शुभचिंतक असो. त्यावरून आयामल्ल यांसही पाठवून द्यावें. ह्मणवून नवाबास राजश्री आनंदराव पंडित सुमंत यांजसमागमें सांगोन पाठविलें. त्याजवरून नवाबानें आयामल्ल यांस भेटीस पाठविले. भेटीनंतर आयामल्ल यांस पहिले त्रिवर्ग यांस सांगोन बोलीचालीचा १ छ० ८ रमजानः- ता० २० दिसेंबर इ. स. १७३७, मंगळवार. २ वरणगांव:- हे गांव खानदेश जिल्ह्यांत भुसावळ तालुक्यांत आहे. - ३ छ० ११ रमजान:- ता० २ जानेवारी इ. स. १७३८ सोमवार. ४ छ० २४ रमजान:- ता० ५ जानेवारी, गुरुवार ५ इस्लामपूरः - भोपाळाजवळ एक लहान गांव आहे. - ६ आयामल:- हा निजामास मिळालेला कोणी नाट सरदार असावा. पुणे नगर वाचन मावर पुणे ८२१९० ce वर्ग ……….……… ......