पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केलें. उपनयनसंस्कार झाल्यानंतर पुढे तीन चार वर्षे विष्णूने आपल्या बापाजवळ वेदाभ्यास केला. त्या वेळी त्याचें अल्पवय असूनही त्याची वेदवि- येमध्यें कुशाग्र बुद्धि व्यक्त झाली. महादेवभटजी व उमाबाई हीं उभयतां वृद्धदशेनें व दारिद्र्यानें अगदीं जर्जर झालीं होतीं, त्यामुळे त्यांस पुत्रसुखाचा लाभ फार दिवस घेतां आला नाहीं. ● व विष्णूचें अवघें बारा वर्षीचें वय असतां त्याचे आईबाप निवर्तले. त्यामुळे त्यावर दुर्धर प्रसंग येऊन तो अगदीं अनाथ झाला. अशा स्थितीमध्ये त्यास ऐहिक मुखाविषयीं विरक्तता उत्पन्न होऊन त्यानें आपल्या क्षणभंगुर आयुष्याचा व्यय ईश्वराच्या आराधनेमध्यें व परमार्थप्राप्तीच्या साधनामध्ये करावयाचा निश्चय केला. बालवयामध्यें ईश्वरभक्तीची लालसा उत्पन्न होऊन ऐहिक सुखास विन्मुख झालेले ध्रुव आणि प्रल्हाद त्यांच्या कथा पुराणांतरीं प्रसिद्ध आहेतच. असो. विष्णूच्या कोमल मनाचा कल ईश्वरप्राप्तीकडे वळल्यावर त्याने लगेच राजुरी येथील गणपतीचे महासिद्ध स्थान हँच आपल्या आराधनेस पवित्र व योग्य स्थळ आहे असे समजून तेथें गमन केलें; आणि तेथे श्रीची आरा- धना सुरू केली. अन्न वर्ज्य केलें व फक्त फलाहार आणि गोमूत्रप्राशन ह्यांवर राहून अनुष्ठान चालविलें. संकष्टी चतुर्थीच्या दिवशीं अगदीं पहांटेस स्नान- संध्या व नित्यकर्म आटोपून सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत श्री गणराजा- सन्निध एका पायावर उभे राहून जप करावा, व प्रतिवर्षी श्रावण मासीं शुद्ध प्रतिपदेपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत एकांतीं एकासनीं समाधिस्थ बसावें, असा क्रम एक तपपर्यंत चालविला. ही एकनिष्ठ व निस्सीम भक्ति पाहून श्रीमंगलमूर्ति प्रसन्न झाले व त्यांनीं स्वप्नांत दृष्टांत देऊन “तुझी कार्यसिद्धि झाली. सर्वमान्य होशील. जे कल्पना चित्तीं धरिशील ते मत्प्रसादें सिद्ध होईल. अतःपर सेवेचा निकर्ष न करणें. ब्रह्मवृत्ति राहून सदैव माझें आराधन करीत जाणें” असें वरप्रदान दिले. त्यामुळे विणूस पर मानंद होऊन त्यानें आपले अनुष्ठान समाप्त केलें व त्याची यथानुकूल्य सांगता केली. तदनंतर त्यास श्री काशीक्षेत्रीं जाऊन तेथील एखाद्या महापुरु घाचा समागम घडावा अशी इच्छा झाली. त्याप्रमाणे त्यानें श्रीची आज्ञा घेऊन काशीक्षेत्रों गमन केलें. ही गोष्ट इ० स० १६६३ च्या सुमारास घडून आली.