पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० आसपास चौकीबंदी करून दाणागवत कुल बंद केलें आहे. नवाब काल- पासून आजीपावेतों आंत उभेच केले होते. धोंड्यावरी व गोळीच्या टप्यावरी आमचे फौजेचे मोर्चे लावून मार देत आहों. नवाब व न बाबांची फौज सत्वहीन झाली आहे. आणि गोटावरी लगट करून दोन तोफा हस्तगत केल्या. अतःपर राजश्री स्वामींच्या प्रतापें निजा- मउल्मुलुक यासी याच ठिकाणीं बुडवून टाकितों दक्षणचे फौजेची यास आशा बहुत होती, त्यास तुझी तिकडे आहां. तुमच्या शहामुळे तेही येऊन पावे असा अर्थ नाहीं, तुर्की फौज जमा करून जितकी मिळेल तितकी मेळवून दक्षणचे फौजेस पायचंद देणें. दाभाड्याकडील श हाणा माणूस पाठवून त्यास आपणाजवळ आणणें. रणौलियास असली तरी उत्तम जाहलें. कदाचित् सोनंगडपावेतों गेले असले तरी तेपावेतों शहाणा माणूस पाठवून दाभाडे, बांडे, गायकवाड आपणा- जवळ आणून तिकडील फौजेस पायबंद देणें. रघोजी भोंसले याकडे पत्रे व एक माणूस पाठवून त्यासही आपणाजवळ आणणें सारांश ते फौजेस पायबंद दिल्ह्यास नवाबास आह्मी बुडवीतच आहों. जें होणें तें धन्याचें प्राक्तन, वडिलांचे पुण्यंकरून उत्तमच होईल. आपल्याकडील लोक सारे सुखरूप आहेत. घोडीं कालचे झुंजीं तीस पसतीसपर्यंत प डिले. व मातबर माणूस कोणी पडिले नाहींत. पांच सात शिपाई पडले. बहुत काय लिहिणें, लोभ असों दिजे हे आशीर्वाद. [ लेखांक ३५] श्री. श्रीयासह चिरंजीव राजश्री आपा यांसी:- . - बाजीराव बल्लाळ आशीर्वाद उपरी येथील कुशल ता०छ २७ रैम- १ रणालें:- हे गांव खानदेश जिल्ह्यांत नंदुरबार तालुक्यांत आहे. २ सोनगड:- हे गुजराथेंत बडोदा संस्थानांत गांव आहे. येथे बळकट किल्ला आहे. ३६० २७ रमजान:- ता० ८ जानेवारी इ. स. १७३८, रविवार