पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ • त्याचे त्रिवर्गास सांगितला. तेव्हां बोलिले कीं, तुमचा मतलब नबाबांस निवेदन करून नवाब तुमचें ऐकतील, परंतु नबाबांची अब्रू वाढविली पाहिजे. प्रातःकाळीं नवाच बाहेर निघतील. तुझी कोस दीड कोस माघारे जाऊन राहणें. आझी त्रिवर्ग तुझांजवळ येतों. बोली चाली करूं. त्यावरून दुसरे दिवशीं छ० १५ रैमजानीं आझी कुच करून कोसाच्या अंतरें बंदगींत राहिलों, नवाव नंतर बाहेर तळावर येऊन मुकाम केला. आबदुल खेरखान व अनवरखान यांस लष्करच्या दर- म्यान पाठविलें. बोलीचालीचें मतलब सांगितलें. ते नबाबांस सांगोन करून देऊं ऐसें बोलोन नबाबांकडे गेले. जाबसाल यावा तो न आला. प्रातःकाळीं नवाबांनीं एकाएकींच नगारा व कुच करून पुनः भुपाळांतच गेले. तेव्हां राजश्री आवजी कवडे व राजश्री यशवंतराव पवार यांणीं दुमदारीस घाव केला. जाटाचे व आवजी कवडे यांची सरमिसळ जाहली. तेव्हां नवाच ठिकाणींच उभे राहिले. आझी त- माम फौजेनिशीं भ॑वते उभे राहिलों होतों. नबाबांनीं आराबा का- ढून टेंकडीपासून अर्धकोस जमीन भुपाळपावेतों दोन प्रहरांपासून सा- यंकाळपावेतों चालत होते. निदानीं तळ्यांत राहिले होते. तोही तळ सोडून फाटकाआंत पहिले चुनगे ठेविले होते त्याजवळ जाऊन केवळ अडचणींत राहिले. बंद होऊन राहिले जैसा मनसबा महमदखान बंगस यांणीं विचारिला त्याचप्रमाणे यांणीं विचार केला आहे. नबाब थोर यांणीं एक तो आमचा मतलब करून देऊन सुखरूप दक्षणेस जावयाचें होतें. परंतु दुसरें बाहेर निघोन जुंजावयाचें होतें. परंतु दोनी गोष्टी न करितां अडचणींत राहिले. अनुचित केलें. या गो- ष्टींत नवाबाची अब्रू काय राहिली ? असो. नवाबांनी काय विचार चि- त्तांत आणिला असेल तो असो. परंतु आपल्या बंदोबस्तांत आतां ● ● १ ता० १५ रमजानः ता० २७ दिसेंबर, मंगळवार. ४