पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ छ० २३ सबैनचें आलें तें छ० ८ रमजानीं आलें. मौजे आहोणे सोन- गीर गिरैनातीर येथील मुकामचें आलें तें काल छ १६ रमैजानीं पावलें. कुशलश्रवणें संतोष वाटला. येथील वर्तमान निजामुल्मुलुख भुपाळच्या आश्रयास गेला. नंतर छ० ३ रमजानीं मुकाबिला केला. युद्ध जाहलें. तें वर्तमान नबाबांनीं बुनगे भूपाळ शहराचे आश्रयानें ठेवून नंतर जाइलें हैं वर्तमान तुझांस पहिलें लिहून पाठविले आहे. त्याजवरून क- ळलेंच असेल. पत्रे रवाना झाली. त्या अलीकडे वर्तमान तरी भुपाळास सभोंवती चौकीबंदी केली. यामुळे दाणा महर्ग जाहला. गवत तो न मिळेसारिखें जाहलें. तेव्हां बोलीचालीचा संदर्भ नवाबांनीं चित्तांत आणून राजश्री आनंदराव पंडित सुमंत यांस पाठविलें. मशारनिल्हे आल्यावरी आझीं आपला मतलब सांगणें तो सांगोन राजश्री बाबूराव मल्हार यांस समागमें देऊन नबाबाकडे पाठविलें, मतलब निवेदन केला. नवावांनीं आज्ञा केली, प्रातःकाळी राजश्री पिलाजी जावधराव व आणखी मातबर पाठविणें; येथीलही माहितगार देऊन बोलीचाली होईल. ऐसें सांगितल्यावरी बाबूराव मल्हार आले. छ० १४ रमजानी आबदुल खेरखान व सय्यद लष्करखान व अनवरखान व सुमंत ऐसे लष्करापुढें टेंकडी होती तेथें आले. आझीं राजश्री पिलाजी जाधवराव व राजश्री बाजी भिवराव व राजश्री बाबूराव मल्हार पाठविले. संभाषण जाहले. आमचा मतलब त्रिवर्गानीं १-६० २३ सवानः - ता० ५ दिसेंबर, सोमवार. - २-६०८ रमजानः – ता० २० दिसेंबर, मंगळवार. - ३ ओहोणे सोनगीरः- हीं दोन गांव खानदेशांत आहेत. - ४ गिरनातीरः- ही तापीस मिळणारी एक लहान नदी आहे. तिच्या कांठी वरील गांवें आहेत. ५ छ० १६ रमजानः - ता० २८ दिसेंबर, बुधवार ६ छ० १४ रमजानः - ता० २६ दिसेंबर, सोमवार