पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७ • नवाब खेरीज दुसरी जागा नाहीं. जे फौज समागमें आहे इतक्यानिशीं रात्रंदिवस कस्त मेहेनत करणें, तें नवावाजवळ करीतच आहों. फळ होतां ईश्वराचें. ***राजश्री आवजी कवडे बरे समयास चांगले सामा- नानिशीं आले आहेत. राजश्री राणोजी भोंसले या ज शे दाकडे आल्याचें वर्तमान आहे. जरी ते आले तरी ते आमचे जाहले. न येती ते गोष्टी- चाही मुजाका काय आहे. एक तो राजश्री स्वामींजवळ मोहिमेस अ- सावयाचें होतें तें तो नाहीं. येव्हां या प्रसंगास तरी त्यांणीं यावें. येथेंही न येत, तेव्हां सरंजाम मुलुख खाऊन अप्रयोजक होतील. तुझांस जो यत्न होईल तो करून तिकडील फौजेस पायबंद देणें. शहीजापुरचा मोंगल दीड हजार राजश्री मल्हारबा व राणवा व यशवंतराव पवार यांणीं बुडविला है वर्तमान पूर्वी तुझांस पत्र लिहिले आहे त्यावरून कळलेंच असेल. राणोजी भोंसले आझांकडे आले तरी बरें. नाहीं तर तुझी त्यांस गाठणें. ते फौज तुमच्या कामाची आहे. वरचेवर कागदपत्र पाठविणें. आणि आपणास सामील करणें. अगर तुझी गांठणें. जे गोष्टीनें ते फौ- जेस आटकाव होय तें करणें. वडिलांचें पुण्य व खावंदाचें आहे तरी त्यास घेतच आहों. लोभ असों दिजे हे आशीर्वाद. [ लेखांक ३४ ] श्री. श्रियासह चिरंजीव राजश्री आपा यांसी बाजीराव आशीर्वाद उपरी येथील ता० छ० १७ रमजान मुकाम भूपाळ जाणोन आपणाकडील कुशल लिहीत जाणें विशेष. तुमचीं पत्र १. शहाजापूरचा मोंगल:- निजामाचा साह्यकारी मीरमानाखान फौजदार शहाजहानपूरकर हा भोपाळ येथे निजाम अडचणीत सांपडला अर्से देखून दुः सरीकडून मराठ्यांवर हल्ला करायाचा प्रयत्न करीत होता. त्यास दाराई सराई ना- मक गांवीं शिंदे होळकर व पवार यांनी ठार मारिला व त्याची दोन हजार फौज बुडविली. २ छ० १७ रमजानः - ता० २९ दिसेंबर इ० स० १७३७ गुरुवार -