पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ कीं, तुझी कोठें जाणार ? आह्मी निघों तेव्हां तुझी समागमें असावें. त्याजवरून ते येतां दिसत नाहीत. आतां मोठा भरंवसा दक्षणी फौजेचा आहे. प्रतिदिनीं पाच सात जोड्या रवाना होतात. कदा- चित् तवकल करून फौज नबाबांस सामील व्हावयास येईल. त्याला आपा, या समय जरी तिकडील तिकडे फौजेस तुमचा शह बसोन आटकली तरी हे फौज बुडवावयास असामान्य दुसरा येणार नाहीं. आह्मांजवळ आहे फौज इतक्यानिशींच नवाबांस जेर करून विल्हे लावितो. ते फौज येऊन सामील झाली तरी नवाब जरा भारी होतील. जाजती श्रम करणे लागतील. याजकरितां फौजांस अटकाव होय तें करणें. यासमय तुझांस जे फौज मिळेल (ते) जमा करून भारी राहणें. दीभाडे बांडे आह्मांकडे आले नसले तरी तुझी आ पणाजवळ बोलावून सामील करणें. राजश्री स्वामींजवळ जो जमाव आ- पला आहे तो आपणांजवळ आणणे. चिरंजीव राजश्री महादोबा यांस लिहून राजश्री स्वामींस विनंती करून राजश्री फत्तेसिंगबावा व राजश्री शंभुसिंग जाधवराव व सरलष्कर व जाधव आणवणें. त्या खेरीज लोक मिळतील ते जमा करून तिकडील फौजांस शह देणें. झणजे एकटें याचें साहित्य दुसरा कोणी करणार नाहीं. नवाबाचा निर्वाह व्हावा या सायास दुसरा ऐसा येणें नाहीं. हे ठिकाणीं लागल्या- वर अवधी दक्षिण निर्वेध होईल. अवध्यांनीं या समयीं या कामांत चित्त घालावें. आमचे फौजेचे उस्तवारीस अगर कर्जपरिवारास एक १ दाभाडे बांडे वगैरे सरदार पेशव्यांस ह्या वेळीं साह्य करीत नसून अलग राहिले होते. त्यांस मदतीस जाण्याबद्दल शाहू महाराजांकडून व पेशव्यांकडून पत्रे गेलीं होतीं. २ राजश्री स्वामी: – शाहूमहाराज ह्यांच्या हुजूर दरबारांत महोदावा ह्मणजे महादाजीपंत पुरंदरे हे असत ह्मणून त्यांचेकडून महाराजांस विनंति करविली होती.