पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५ गोटांतच उभे राहतात. बाहेर युद्धास निघतात ऐसी आवाई घालितात. परंतु निघत ना. डेरेचौक्या गोटापुढे होत्या. तो माघारा कोटा किल्ल्याच्या आश्रयास नेऊन मोर्चेबंदी मांडली. कुसूं घालितात. याप्रकारचा प्रसंग आरंभिला आहे. धान्य तें महर्ग होत चाललें. चौ दिवसांत रु- पयाचे पीठ चार शेर जाहलें. पुढे काय होईल तें पहावें. हत्ती घोडे यांस वैरण अगदीं नाहीं. एक दिवस झाडाच्या साली व तळ्यांतील लव्हाळे चारिले. आतां तें कांहींच नाहीं. रजवाडेकरी, बुंदेले व सवाईची फौज या समाग में आहे. ती प्रास्थाई पडली. नवाबाचा इ- तबार त्यांस नाहीं, व त्यांचा इतबार नवाबास नाहीं. पळोन निघावें ह्मणतील तरी बुनगे शहरांत अडकविले यामुळे निघों फावत नाहीं. बा हेर युद्धास निघावें तरी सोबतीयांचा भरंवसा न पुरे. आमच्या फौजा तों चौगीर्द बैसल्या आहेत. रात्रीचे बाणबंदुका चौक्यांवर चालवितो यामुळे सारी रात्र दंगे गोटांत होऊन फौजा ताटकळोन उभ्या राह- तात. घोड्यांस चारा नाहीं. दुसरें, सारा वेळ तयारी. ऐसी जाजती मां- डली आहे. नवाब बुद्धिवंत होत्साता हे बुद्धि वृद्धापकाळीं करून बदव करून घेतला. दिल्ली आदिकरून सतत चालली. कदाचित् नवाबांनी रजपुतांनीं अवसान करून बाहेर युद्धास निघाले तरी कोस दोन कोस वेदून लगट करून निघते तरी सभवतें बैसलोंच आहों. जे गत बंग- साची ते गत यांची होईल. नबाब थोर अमीर, फौज पाहतां तीस चा ळीस हजार, हातनाला, व सुतरनाला, व बरकंदाज, व रेहकले समा- गमें बहुत, ऐसें असतां आश्रयास बसावें (है) श्लाघ्य नव्हतें. विचारें पाहतां बसावया कारण हेच कीं, कांहीं दिल्लीची फौज मदतीस यावी व दक्षणी फौज यावी. त्यास दिल्लीस फौजांविसीं पादशाहांस अर्जी जाहली. त्यांणीं खानदौरास व कमदर्दीखान यांस पादशाहांनीं फर्माविलें १ लेखांक ३६ मधील बंगसासंबंधाची विस्तृत टीप पहा.