पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ पाटीस, नाला पुढें, देऊन राहिले. आझींही त्याच दिवशीं छ. ३ रैम- जानीं चालोन घेतलें. नबाबांनीं सवाईचे पुत्र व बुंदेले सभासिंग व जाट व रजवाडीयांच्या फौजा व तोफखाना ऐसा एक तोंडी झुंजाची जागा होती ते वाट बांधोन उभे केलें. आपण खासा पाठीवर उभे राहिले. आमच्या फौजा राजश्री राणोजी शिंदे व राजश्री पिलाजी जाधवराव व सयाजी गुजर व किरकोळ पथकें रजपुताचे फौजेवर उठलीं. आराबी- याचा मार सोसून थडक मोठी जाहली. दिडरों माणूस रजपुतांचें मारिलें. आपणाकडील पन्नास साठ माणूस ठार झाले. दोन चारशें जखमी. तैसीच घोडीं शंभर पावेतों पडलीं. पांच सातरों जखमी जाहलीं. परंतु नवाबांनी तमाशा बराच पाहिला. रजपुतांपुढें गजड्याचा आरावा व नाला नसता तरी मारून गर्दीस मेळविले जाते. असो. युद्धप्रसंग जा- लियावर नवाबाच्या गोटापासून दोन बाणांच्या टप्पावर सड्या फौजांनी बसलो आहों. नबाबाची गांठ भुपाळापासून एकदोन मजलीवर पडती तरी अवधेच फौजेची मिठी चौकीर्द पडती. तर राजश्री स्वामींच्या प्र तापे नबाबाचे डोळे थंड होते. परंतु आश्रयास गेले. असो. एक झुंज झालियावर आज तीनचार रोज आनमान पाहिला. त्यास नवाबांनीं कुल आपले बुनगे व रजपुतांचे व रजवाडकरांचे बुनगे कुल भुपाळ शहरांत आश्रयास घातले. आपले डेरेही माघारी अडचणींत नेले. तमाम फौजेनिशीं प्रातःकाळपासून तयार होऊन हत्तीवर बसून ● १ छ० ३ रमजानः - ता० २५ दिसेंबर ३० स० १७३७ गुरुवार. - - २ सवाईचे पुत्रः - सवाई जयसिंगास इसरीसिंग व माधवसिंग असे दोन मुलगे होते त्यांपैकी एक फौज घेऊन निजामाच्या मदतीस आला होता. - ३ सभासिंग बुंदेले: – राजा छत्रसालाचा नातू. बुंदेले राजे मराठ्यांच्या व तीचे होते परंतु निजामानें जबरदस्तीने त्यांना आपल्या बाजूस वळवून घेतले होते.