पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ करा. आणीक एखादा देव पाहून सेवा करूं. पिंपरीसच बोलिलें आहां कीं "माझा राग तुजवर होणार नाहीं. कदाचित् रागे भरलों तरी चाल- णार नाहीं." त्यास आतां लिहिलें कीं, "पिंपरीस मरत होतों, ज्वरानें शुद्ध नव्हती. ते बोली प्रमाण नाहीं. "तरी मरत होतास तरी रात्रींच माझे रक्षणास कैसा आलास ? ह्या गोष्टी कशास लिहितां ? जर आझी उमगतों न तरी त्वां भार्गवच साक्ष असेल. आतांच उठोन संन्यासी होऊन एखादेकडे उ टोन जावें ऐसें वाटत नसेल तरी भार्गवाची शपथ आहे. परंतु मा गती कांहीं विवेक करून धीर धरून पाहतो. जर धीर धरवेल तरी धरवून पाहूं. नका ह्मणाल तरी आझी तों सिद्धच आहों. सेवेसी श्रुत होय. हजार रुपये सातायाहून धावडशीस पावते करणें ह्मणून पूर्वीच खंडूचें पत्र अगोदर दोन दिवस लिहून पाठविले आहे. पावलें असेल अगर पावतील. उत्तर पाठवावें हे विज्ञप्ति. [ लेखांक ३३] श्री. श्रियासह चिरंजीव राजश्री आपा यासीं:- बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद उपरी येथील कुशल ता० छ ७ रमजान जाणून आपणाकडील कुशल वृत्त लिहून पाठवणें. यानंतर निजाम उलमुलूख माळव्यांत रवाना झाल्यावर आह्मीही त्वरा करून बाबाच्या मुकाबलियास आलों. आठ नवकोसांचें अंतर उरतांच न- बाबाच्या फौजा सलाबत खाऊन भुपाळ किल्ल्याच्या आश्रयास गेले. तळें - - १ पिंपरी :- पुणे जिल्ह्यांत सुपें तालुक्यांत एक लहान गांव आहे. येथे स्वामींचे देवस्थान असून हा गांव त्याकडे इनाम आहे. येथे स्वामी केव्हां केव्हां राहत असत. २ मनुष्य वैतागला ह्मणजे सर्व संग सोडून संन्यासी बनतो त्याप्रमाणें बाजीरावांच्या मनाची स्थिति झाली होती. ३ छ० ७ रमजानः ता. १९ दिसेंबर ३० स० १७३७ सोमवार. -