पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ तुझीच आहे. आणि आह्मां लेकराचे लडिवाळ चालवून कीर्तिरूप होसील तरी तूंच होसील गांवचा मजकूर लिहिला की शिष्य पाठविणें, त्याचे हवालें करूं. तरी शिष्य मीच आहे. मला बोलवावें; मीच येतों. हा कारभार पहावासा असला तरी येऊन आटपणें पाहिजे तरी आह्मी मुतालिक तुझे. टाकून द्या ह्मणाल तरी येतो. नाहीं, चार दिवस आ- मचेच हातून घ्यावासा असेल तरी तैसीच आज्ञा करावी. आह्मी तो कर्जदाराचे नरकांत बुडालों. तुझे वचनावर जर अवंदाचे सालीं जर मला कर्ज व राजा व लोक यांचे देणियांपासून मुक्त करशील यास्तव देवाजवळ आपला प्राण देऊं. आझांस मुक्त लेंकरास कराल ऐसें वचन अभयपूर्वक आलिया एवढे आठ महिने आणीक जीव धरून पाहू. यांत जर आह्मी कृत्रिम लिहिले असेल तरी आह्मांस तुझीच शफत असे. काय तें उत्तर लवकर पाठविणें. तैसीच तजवीज करूं तूं देव कैसा कीं आमची कृत्रिमता किंवा निर्मळता न कळे. ध्यानांत येईना तेव्हां आह्मीच प्राक्तनाचे गाढे. आमचें कपाळ फुटलें ! तुमचा कोप आह्मां गरीबांवर कशास ? जे दुष्ट असतील त्यांजवर करा कीं, तेणेंकरून प्रजा सुख पावे. आज दाभाडे, गायकवाड, बांडे कोटी कोटी रुपये खजिने आणि मीन आझी तुझे पायाशीं व धन्याचे पायाशीं निष्ठेनें वर्ततों ते अन्नास महाग झालों! त्यांत आझी चिपळुणें, तुझे वाढविले, लाज तुला अ- सावी. लाज घरशील तरी त्यांजवर कोप करा आणि आमचे उर्जित करून राहिलें ब्राह्मणाचें काम करून घ्या. नाहीं तरी आह्मांवर कोप राग कशास पाहिजे ? आपले स्वाधीन करून घे आणि आझांस मुक्त ● १ दाभाडे, गायकवाड व बांडे हे आपल्या स्वार्थाकडे दृष्टि देऊन स्वतंत्र- पणानें प्रांतोप्रांतीं स्वान्या करीत होते व मिळेल तितका फायदा आपल्या पदरांत ओढून गबर झाले होते असा त्यांच्यावर हा आरोप आहे.