पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ झाले होते तसेच झाले. आपण या गोष्टीचा शोध करावा. आतां नित्य उठोन कर्जदारांचे पाया पडावें. शिलेदारांचे पाया पडतां पढतां कपाळ छिनंत चाललें. आतां हीं मुखें आझांस नकोत. तुझी या आणि आपला कारभार संभाळा. अगर टाकून द्या ह्मणाल तरी टाकून उठोन येतों. वरकड तुझ आपल्या पैक्यासाठीं लिहिलें तरी स्वामीनें कांहीं चिंता न करावी. आमचा जीव आहे तो पैकीयाची काय चिंता आहे ? कोणे समयीं पाहिजे तें आह्मांसही कळतें. पैका पावता करूंच. आतां प्रस्तुत तो आमचा जीवच मात्र आहे. येथें येऊन घेणें अगर तेथें बोलावशील तरी सर्वसंग टाकून येतों. तुझी थोर देव. तुझांस वचनाम धरावें तें वचन खरें न झालें ह्मणून आह्मीं लेकरांनीं तुमची रड तुझां- पासी रडावी, आणि रडतियाची अशी तुझी पुसोन परिणाम त्याचा करावा तो कराल. तुमचें झाड लाविलें तोडाल तरी आतां तोडा, वाढवाल तरी वाढवा. या गोष्टीस नादर कोण आहे. तुमचे दबवणीस आह्मी कां भिऊं १ मारशील तरी तूंच बावा मारशील; यांतही कीर्ति १ ग्रांटडफनें “Among Hindoos an attitude of worship or adoration is to place the forehead at the threshold of a temple, or at the foot of the idol, and is used in supplication to a superior. The following extract of a letter from Bajee Rao to his Mahapooroosh must of course be understood figurative- ly; but it shows the embarrassments under which he labour- ed:—“I have fallen into that hell of being beset by creditors, and to facify sovcars and silledars, I am falling at their feet till I have rubbed the skin from my forehead." Part of this distress originated in the high rates of pay which he was obliged to give, in order to out-bid Nizam-ool-Moolk, and secure the best of the Deccan soldiery." ह्मणून जी टीप दिली आहे ती ह्याच मजकुरास अनुलक्षून आहे. त्यावरून हे पत्र ग्रांट डफ ह्यांनी पाहिले होतें ह्यांत शंका नाहीं.