पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री महापुरुष ब्रह्मद्रस्वामी धावडशीकर ह्यांचें चरित्र. भाग १ ला. पूर्ववृत्तांत. सर्व महाराष्ट्रामध्यें “महापुरुष” ह्या नांवानें प्रसिद्ध असलेले सत्पुरुष व छत्रपति शाहु महाराज व थोरले बाजीराव पेशवे ह्यांचे गुरु श्रीमत् ब्रह्मंद्र- स्वामी ह्यांचे जन्मस्थान वन्हाडप्रांतामध्यें श्री गणपतीचे राजुरीनजीक दुधे- वाडी ह्मणून एक लहानसें खेडें आहे तें होय. येथें महादेवभट नामक एक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण राहत असे. त्यास उदरभरणार्थ इतर साधनें नसल्यामुळे तो दुधेवाडी व राजुरी ह्या गांवीं भिक्षुकी करून आपला चरितार्थ चालवीत असे. ह्याच्या पत्नीचे नांव उमाबाई असें होतें. ह्या उभयतांस बरेंच वय होई तोपर्यंत संतति झाली नाहीं. पुढे महादेवभट ह्यांस वृद्धापकाळी ह्मणजे सुमारें साठावे वर्षी एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचें नांव त्यांनीं विष्णु असें ठेविलें. विष्णूच्या जन्मतिथीची बरोबर माहिती उपलब्ध नाहीं, त्यामुळे ती देतां येत नाहीं. तथापि त्याचा जन्म इ० स० १६४९ ह्या वर्षाच्या सुमारास झाला असावा असें स्थूल प्रमाणांवरून मानण्यास हरकत नाहीं. विष्णूचे वय सात आठ वर्षीचें झाल्यानंतर त्याच्या आईबापांनी भिक्षाटण करून थोडेंसें द्रव्य संपादन केले व ३० स० १६५६ सालीं दुधेवाडी येथें विष्णूचें मौंजीबंधन