पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० तरी बावा, आझांस काय चिंता आहे. तुझी जालेत गोसावी, आणि आझांकडे प्रपंच लाविला. त्या प्रपंचामुळे आह्मी जोड इतकीच केली कीं वीस लाख रुपये कर्जदार झालों. कर्जदारांचे नरकांत कुजतों इतकेंच मेळविलें. या दुःखास्तव गतवर्षी पिंपरीस आलो तेव्हां सारें तुमच्या हवाली करून मोकळे होऊन देवाची सेवा करावी हा हेत ध रून स्वामींस विनंती केली. स्वामी कृपाळु होऊन आश्वासन दिल्हें, "भार्गव तुझे ध्यानीं आहे. फत्ते तुझी होईल. व पैकाही उदंडसा मि ळोन कर्ज फिटेल. सर्व साह्यकारी भार्गव आहे." तेवढे वचनावर दृष्टि देऊन होतों. त्यास चिरंजीव तिकंडे तुझा गेला होता; यश मात्र थोडें बहुत आलें; पैका न मिळाला. लष्करचे हाल श्रीरंगपट्टणचे वेळेस १ तिकडे: – ह्मणजे हिंदुस्थानच्या स्वारीस. ह्या स्वारीत फायदा कांही झाला नाहीं, फक्त यश मात्र आले, माळवा वगैरे प्रांत अद्यापि मिळाला नाहीं असें त्यावरून उघड आहे. त्याअर्थी ही सन १७३४ चीच स्वारी असावी. २ श्रीरंगपट्टणचे वेळेस लष्करचे फार हाल झाले होते ह्मणून हाटले आहे. ही श्रीरंगपट्टणाची स्वारी सवा आशरीनच्या रजव महिन्यांत ह्मणजे इ० स० १७२७ च्या फेब्रुवारीमध्ये झाली होती. छ० २३ ला बाजीराव श्रीरंगपट्टण मुकामी होते. सोंधे, बेदनूर, वगैरे ठिकाणी जमादिलामध्ये जाऊन नंतर बाजीराव श्रीरंग- पट्टणास गेले. कर्नल विल्कस यांनी मैमूरच्या इतिहासामध्ये ह्या संबंधानें विशेष माहिती दिली नाहीं व ग्रांट डफ ह्यांनीही विशेष माहिती दिली नाहीं. त्यांनी फक्त फत्तेसिंग भोंसल्यासह बाजीराव १७२६ मध्ये कर्नाटकामध्ये गेले, प्रांत लुटून श्रीरंगपट्टणावर खंडणी बसविली, इतकी माहिती देऊन असा शेरा मारिला आहे कीं: —“No particulars of this campaign have been discovered; but it appears by a letter written 12 or 13 years afterwards by Bajee Rao to his brother, that they lost a num- ber of men without gaining advantages which had been antici pated." ह्यावरून ग्रांटडफ ह्मणतात त्या अर्थाचे चिमाजी आपांस लिहिलेले एखादें पत्र निराळे असले पाहिजे. परंतु बाजीरावांच्या वरील पत्रावरूनही श्रीरं गपट्टणच्या स्वारीचा बोध होत आहे.