पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९ . पुढील गोष्टी होईल नव्हे हें स्वामी जाणत. इतकीयावर मी गरिबानें काय करावें ? कोणता विचार करावा हे आज्ञा जाहली पाहिजे. माझे विचारें हे सर्व संग सोडून उठोन एखादेकडे जावें. पुनः तोंड खावंदास अगर लोकांस दाखवावें असें नाहीं. परंतु तुझी वडील, वर्तमान अगो- दर श्रुत व्हावें याकरितां लिहिलें असे उत्तराचा मार्ग पाहतों. उत्तर आलियावर जो विचार चित्तांत आला आहे तो करून येतो. तुमचे शरीरीं सावकाश नाहीं. कुवत नाहीं कीं, तुझांस लिहून एखादा महत् उपायें संकट देवास घालूं ते गोष्ट तों राहिली. इतकीयावर हें कार्य राहतें, कर्ज फिटत नाहीं. आतां वांचलियाचें सार्थक काय ? आपला जि वाचा त्याग करितों. लटकी समजाविसीचा अर्थ ल्याहाल तरी मी ऐकत नाहीं. जर रुपयांचा उपाय करून राजश्री स्वामींचा निरोप या चौ पांचा दिवसांत येईल संतोषेकरून, तरीच बरें नाहींतरी आमचा उपाय आह्मी करूं, कोन पाठविला आहे. घेणें. साड्या नव्याच दोन पाठविल्या आहेत घेणें पान आणावयास साताऱ्यास माणूस गेला आहे. आला ह्मणजे पाठवून देऊं. राजश्री बापूजीपंत उदईक येतील. वासे त्यांचे हवाली केले ते पावते करतील. वरकड रानचे जिनसासाठीं माणसें पा ठविली आहेत. आल्यावर पावतें होईल. उत्तर उद्यां पाठवून देणें. तुमची आमची भेट होणार नाहीं. सेवेशी श्रुत होय हे विज्ञप्ति [ लेखांक ३२] ● श्री. श्रीमत् परमहंस परशरामबावा स्वामींचे सेवेसी:- विनंती सेवक आज्ञाधारक बाजीराऊ कृतानेक विज्ञापना. महारा- जांनीं खंडूबरोबर आशीर्वादपत्र पाठविलें व कित्येक आज्ञा केली १ हे पत्र फारच आणीबाणीचे आहे. मनुष्य अतिशय त्रासला ह्मणजे तो कसा एकेरीवर येतो तें ह्या पत्रावरून फार चांगले व्यक्त होतें. बाजीरावास स्वा- मींचा किती आधार होता व सर्व राजकारणें त्यांच्या आधारावर कशीं अवलंबून होतीं हैं ह्या पत्रावरून स्पष्ट होतें.