पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ नाहीं. आझी लवकरं सातारि (यास आलों), आज नव दिवस जाहले. राजश्री स्वामी निरोप देत नाहींत. आतां दोन प्रहरांच राजश्री अंबाजी- पंतांचें पत्र आलें कीं,“पूर्णिमेकरितां येथें [येणें] फारसे रागें भरले आहेत. विलयास हे खास गोष्ट जाईल." असेंच लिहिले आहे. त्यास आह्मी तो स्वामींचे आज्ञेवरून लोक, हशम, राउत, जमा करीत आहों. हजार दोन हजार माणूस जमा झाले. पैका रोज खर्चतो, पूर्णिमा जालियावर मुहूर्त पाहून कार्यास जावें. स्वामींचे आज्ञेप्रमाणें कार्यसिद्धि करावी. त्यास हा गुत्ता राजश्री कडील. ऐसीयास हे गोष्टीस उपाय काय करावा? आतां एवढे कार्यास आरंभ करून हा नाश एक. दुसरें पुढें होईल हा भरंवसा नाहीं. नवा दिवसांची मुदत करून व पुढें सव्वा महिन्यांत कार्यसिद्धि होईल अशी आज्ञा, त्यास एक गोष्ट तो ऐशी दिसते. १ “आह्मी लवकर सातारि ( यास आलों )" हे वाक्य मुळामध्यें स्पष्ट नाहीं. तथापि पुढील संदर्भानें तें जुळविले तर पुन: “पूर्णिमेकरितां येथे फार रागें भ रले आहेत. विलयास हे खास गोष्ट जाईल” असें अंबाजीपंत लिहितात त्याचा संबंध नीट उलगडत नाहीं. “येथे” ह्मणजे कोठें ? रा. अंबाजीपंत यांनी साता- रच्या दरबारांतील खवरबातमीचे पत्र पाठविले ह्मणावें तर बाजीराव तेथे नऊ दिवस आहेत. मग “पूर्णिमेकरितां येथे फार रागे भरले आहेत" असे लिहि ण्याचा उद्देश काय ? ‘‘पूर्णिमेकरितां येथें” हे वाक्य बरोबर जमत नाहीं. तेवढ्या- करितां “येथें” ह्या शब्दाऐवजी “येणे” असा शब्द असावा असे मानून जर ‘‘पूर्णिमेकरितां येणें. फार रागे भरले आहेत." अशीं दोन वाक्यें केली तर अर्थाचा संदर्भ बराच जुळतो. बाजीराव खुद्द साता-यास नसावेत असे “पानें आ णावयास साताऱ्यास माणूस गेला आहे” असे त्याच पत्रांत शेवटीं वाक्य आहे त्यावरून बाजीराव सातान्यानजीक असावेत हे उघड आहे. धावडशीहून स्वा मींकडून पत्राचे उत्तरही दुसरे दिवशीं मागितले आहे त्याअर्थी बाजीराव धाव डशी व सातारा ह्यांच्या नजीक असले पाहिजेत. " २ अंबाजीपंत: - पुरंधरे. - ●