पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. बुडविलें. एवढे गोष्टीकरितां प्राण जाता तरी बरें होतें. विष खाऊन मरावें इतकेंच, किंवा स्वामींचे पाय धरून बसावें इतकाच पदार्थ उ रला आहे! दरबारीं सर्व साहित्य आमचें करणार सर्व आपल्यास विदि- तच आहे. स्वामींस कृपा येईल तरी आझी कर्जापासून मुक्त होऊं. लोकांचे नरकवासापासून दूर होऊं तो पदार्थ करावा. तरीच मज बा- ळकावर कृपा पूर्ण आहे. आतां प्रस्तुत सातारियास जात नाहीं. तेथें जाऊन काय करावें ? आमचे उरावर पाय देऊन कार्य करतील यास्तव जात नाहीं. काले करून बसलों आहे. सर्व लज्या आह्मां कोंकण्यास आली. तूं भार्गव आमचा साह्यकारी असतां ऐसे कार्य अविलंबिलें तेव्हां तुझे हाणविल्याचें सार्थक काय ? ज्या स्त्रीस पुरुष नाहीं तिचे गत होते तैसी तुझी असतां आमची गत साज्यांनी मांडली आहे. बरें, चित्तास येईल तरी आपलें बिरित ( ब्रीद ? ) रक्षावें हे विज्ञापना. [ लेखांक ३१] श्री. - श्रीमत् महाराज परमहंस परशरामबावा स्वामींचे सेवेसी:- आज्ञाधारक चरणरज बाजीनें कृतानेक विज्ञापना. स्वामींनीं आशी- र्वादपत्र पाठविलें तें पावलें, कितेक अर्थ लिहिला त्यास आमची निष्ठा स्वामींचे पायापाशीं आहे नाहीं हें आशीं काय सांगावें ? जैसी स्वामी बुद्धि चित्तांत प्रेरतील तैसी होईल. असो. इतका परिवार लिहावा ऐसे १ सातान्यास प्रतिनिधि वगैरे मंडळी बाजीरावाच्या विरुद्ध होती त्यामुळे सातान्यास जाण्यास बाजीराव धजत नव्हते असे ह्या पत्रावरून दिसून येतें. “आमचे उरावर पाय देऊन कार्य करतील" ह्मणून जे लिहिले आहे ते कार्य कोणतें ? २ शेवटच्या शेवटच्या वाक्यांवरून बाजीरावांची स्थिति किती करुणास्पद झाली होती हैं उघड होतें.