पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ [ लेखांक ३०] श्री. ● श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसीः— अपत्यें बाजीराव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता० छ २५ जिंल्काद स्वामींच्या आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें उत्तम समयीं पावोन बहुत समा- घान जालें. पांचहजार रुपये कर्जाचे ऐवज पाठवणें ह्मणून आज्ञा, त्यास तूर्त येथील विचार राजश्री अंतोबा सांगतील त्याजवरून कळेल. स्वामींची आज्ञा तो न उल्लंघावी याकरितां राजश्री अंताजीपंताकडून तूर्त दोन हजार रुपये देविले आहेत. ते घेऊन पावलियाचें उत्तर त्या- जपासीं द्यावयास आज्ञा केली पाहिजे. वरकड कित्येक अर्थ राजेश्री अंतोबापासीं सांगितला आहे. ते निवेदन करतील. त्याचा विचार काय करणें तें करावा. त्याप्रमाणे वर्तणूक करून तीन हजार रुपये श्रावण भाद्रपद पत्तर (पर्यंत १) पावते करूं. सर्वप्रकारें एक निष्ठेनें सेवा केली तिचें फल प्राप्त जाहलें. त्याचें त्यास दिल्हें, देऊत ! परंतु आझांस कर्जानें ● - १ ले० ३०।३१।३२ हीं पत्रे बाजीराव अतिशय कर्जग्रस्त झाले त्या वेळचीं आहेत. ग्रांटडफ साहेबांनीं “Bajee Rao, owing to the vast army he had kept up, both to secure his conquests and to overcome his rivals, had become greatly involved in debts. His troops were in arrears; the sovkars ( or bankers), to whom he already owed a personal debt of many lakhs of rupees, refused to make any further advances, and he complained bitterly of the constant mutinies and clamours in his camp, which occasioned him much vexation and distress." ह्मणून बाजीरावाच्या ज्या स्थितीचे वर्णन केले आहे, त्याच स्थितीचे उत्कृष्ट चित्र ह्या पत्रांवरून व्यक्त होतें. ग्रांटडफ हीं पत्र इ० स० १७३६ ह्या सालाखाली देतात परंतु त्या पत्रांची बरोबर ता- रीख व सन समजणे फार कठीण आहे. २ छ २५ जिल्काद-८ एप्रिल इ. स. १७३५१